Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र लेकीच्या वाढदिवशी करीना कपूरची खास पोस्ट, म्हणते- "खूप प्रेम आणि भोपळ्याची भाजी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:21 IST

अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या साराचा आज वाढदिवस आहे. साराच्या वाढदिवशी अभिनेत्री करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे.

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सारानेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या केदारनाथ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने सुशांत सिंग राजपूतसह स्क्रीन शेअर केली होती. पहिल्याच सिनेमातून साराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये सारा दिसली. अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या साराचा आज वाढदिवस आहे. 

साराच्या वाढदिवशी अभिनेत्री करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सैफ आणि साराचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा आणि सैफने सूटमध्ये ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "हॅपी बर्थडे डार्लिंग सारा...खूप सारं प्रेम आणि भोपळ्याची भाजी पाठवत आहे", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. 

दरम्यान, सैफने १९९१ मध्ये अमृता सिंगबरोबर लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर १३ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. २०१२ मध्ये सैफने करीनाशी दुसरा विवाह केला. त्यांना तैमुर आणि जेह ही मुले आहेत. 

टॅग्स :सारा अली खानकरिना कपूर