Join us

'चका-चक' गाण्यावर सारा अली खान आणि अनन्या पांडेचा जबरा डान्स, एकाच व्हिडीओत डबल धमाका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:15 IST

Sara Ali Khan and Ananya Panday Dance : सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात दोघींनी एकत्र डान्स केलाय.

बॉलिवूड स्टार्स फॅन्सचं मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. कधी सोशल मीडियावर तर कधी मोठ्या पडद्यावर तर कधी अवॉर्ड शोजमध्ये ते आपल्या परफॉर्मन्सने फॅन्सचं मन जिंकतात. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात दोघींनी एकत्र डान्स केलाय. 'अंतरंगी' या सारा अली खानच्या आगामी सिनेमातील गाण्यावर त्यांनी डान्स केला.

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२१ सोहळा (Lomat Most Stylish Award 2021) नुकताच पार पडला. यावेळी अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे याही आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स केला. साराने या डान्सची एक क्लिप तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. साराचं हे गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. त्यात दोघींनी अशाप्रकारे हा पहिला परफॉर्मन्स दिला असेल. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.

साऊथ स्टार्ससोबत दोघीही करणार धमाका

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर सारा अली खान बऱ्याच दिवसांपासून 'अतरंगी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार दिसणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे. तेच अनन्या पांडे साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लिगर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात माइक टायसन सुद्धा दिसणार आहे. या सिनेमाची शूटींग नुकतीच संपली. 

टॅग्स :सारा अली खानअनन्या पांडेलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस