Join us

​ संतापली जरीन खान! म्हणे, असल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:42 IST

सध्या बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरु आहे. या बातम्यांनी ...

सध्या बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरु आहे. या बातम्यांनी काही लोकांचे मनोरंजन होत असले तरी खुद्द जरीन मात्र यामुळे चांगलीच भडकली आहे. हे सगळे लज्जास्पद असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मीडियावर तिने याबद्दलचा संताप बोलून दाखवला आहे.सोशल मीडियावर माझे नाव शाहिद आफ्रिदीशी जोडले जात आहे. अशा अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की,शाहिद पूर्णपणे फॅमिली मॅन आहे. मनाने सुंदर व्यक्ती आहे. लोकांनी अशा भलत्या सलत्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. अशा पोस्ट व्हायरल करणाºयांनी थोडी लाज बाळगण्याची गरज आहे, असे TWEET जरीनने केले आहे.काही दिवसांपूर्वी जरीनने शाहिद आफ्रिेदी व त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामुळे शाहिद व तिच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्यापूर्वी अनेकदा जरीन अनेकदा शाहिदसोबत दिसली आहे. त्यामुळे तिचे अन् शाहिदचे नाव जोडले जाणे साहजिक होते. पण आता जरीन यामुळे संतापली म्हटल्यावर कदाचित तसले काही नसेल, असे मानू या. ALSO READ : ​1921 : पुन्हा एक हॉरर सिनेमा...पाहा ट्रेलर!! सध्या जरीन विक्रम भट्ट यांच्या ‘१९२१’ या हॉरर मुव्हीत बिझी आहे. यात जरीन करण कुंद्रासोबत रोमान्स करताना दिसेल.  हा चित्रपट ‘१९२०’चा सीक्वल आहे. ‘१९२०’प्रमाणेच या चित्रपटात एक रोमॅन्टिक आणि इमोशनल कथा पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच जरीन खानचा ‘अक्सर2’ रिलीज झाला. मात्र हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. अलीकडे ‘अक्सर2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जरीनसोबत लोकांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अचानक चाळीस ते पन्नास लोकांच्या घोळक्याने   जरीनला घेरले आणि तिच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी त्यांनी धक्काबुक्की सुरु केली होती. याच गदीर्तील काहींनी जरीनसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे व्यथित जरीन यानंतर लागलीच रात्रीची फ्लाईट पकडून मुंबईला परतली होती.