बॉलिवूडची ही सौंदर्यवती रुपेरी पडद्यावर साकारणार संजूबाबाची आई,नर्गिसच्या भूमिकेत झळकणार ही जगतसुंदरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 15:28 IST
बॉलिवूडमध्ये जुन्या जमान्यात गाजलेल्या सिनेमांचा रिमेक बनणं ही काही नवी गोष्ट नाही.आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनले ...
बॉलिवूडची ही सौंदर्यवती रुपेरी पडद्यावर साकारणार संजूबाबाची आई,नर्गिसच्या भूमिकेत झळकणार ही जगतसुंदरी!
बॉलिवूडमध्ये जुन्या जमान्यात गाजलेल्या सिनेमांचा रिमेक बनणं ही काही नवी गोष्ट नाही.आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनले आहेत. आता पुन्हा एकदा आणखी एका रिमेकची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.या रिमेकची चर्चा होण्यासाठी निमित्त ठरल्या आहेत बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री. एक जुन्या जमान्यात हिंदी सिनेमा गाजवलेल्या अभिनेत्री तर दुसरी आजच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक तसंच जगतसुंदरी.या अभिनेत्री म्हणजे नर्गिस आणि ऐश्वर्या राय बच्चन.बॉलिवूडच्या या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन झळकणार असून ती बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांनी साकारलेली भूमिका साकारणार आहे.1967 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'रात और दिन' या सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन काम करणार आहे.'रात और दिन' या सिनेमातील भूमिकेसाठी नर्गिस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या सिनेमात नर्गिस यांनी मल्टिपल पर्सनालिटी डिसऑर्डर आजारग्रस्ताची भूमिका साकारली होती.'शब्द' या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळीच संजय दत्तने ऐश्वर्याला 'रात और दिन' या सिनेमाच्या रिमेकबाबत विचारणा केली होती.ही भूमिका साकारल्यास आपल्याला आनंद होईल असं त्यावेळी संजय दत्तने म्हटले होते.त्यावेळी ही भूमिका म्हणजे मोठी संधी असल्याचे सांगत ऐश्वर्याने संजूबाबाच्या ऑफरला तात्काळ होकार दिला.सध्या ऐश्वर्या 'फन्ने खाँ' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.ऐश्वर्या राय बच्चनसोबत या सिनेमात अनिल कपूर आणि राजकुमार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.यासोबतच ती श्री नारायण सिंह यांच्या एका सिनेमातही काम करत आहे.मात्र ऐश्वर्या साकारणार असलेल्या नर्गिस यांनी अजरामर केलेल्या भूमिकेची सगळ्यांनाच प्रतीक्षा असेल.मीडिया रिपोर्टनुसार 'रात और दिन'च्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी ऐश्वर्याने 10 कोटींचे मानधन मागितले होते.या सिनेमात ऐश्वर्या रायचा डबल रोल असणार आहे.त्यामुळे या भूमिकेसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. ऐश्वर्याच्या डिमांड निर्मात्यांनी मान्य केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमासाठी ऐश्वर्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे.यादरम्यान जर ऐश्वर्याकडे एखाद्या दुसऱ्या सिनेमाची ऑफर आली तर तिला ती नाकारावी लागेल. त्यामुळे ऐश्वर्याने केलेली डिमांड ही योग्य आहे.ऐश्वर्या पहिल्यांदाच कोणत्या चित्रपटात डबल रोल करताना दिसणार आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत संजय दत्त ही दिसणार आहे.