Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी संजूबाबा जयपूरमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:13 IST

 संजय दत्त आणि त्याचे कुटुंबीय जयपूरला त्याच्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी रवाना झाले आहेत. पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत तो ...

 संजय दत्त आणि त्याचे कुटुंबीय जयपूरला त्याच्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी रवाना झाले आहेत. पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत तो एअरपोर्टवर दिसला.फिल्म डिस्ट्रिब्युअर राज बंसल यांचा मुलगा अभिमन्यू याच्या लग्नासाठी दत्त फॅमिली ही जयपूरला आली आहे. २५ एप्रिलला फार्म हाऊस येथे लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत.बंसल संजय दत्त यांना घेण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. इतर सेलिब्रिटींमध्ये अजय देवगण, पत्नी काजोल आणि तनिषा मुखर्जी हे देखील या लग्नासाठी येणार असल्याचे कळते.