Join us

संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’त नाही तर या सिनेमात झाली आलियाची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:27 IST

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि सलमान खानला घेऊन संजय लीला भन्साळी  ‘इंशाअल्लाह’ सिनेमा तयार करणार होते.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि सलमान खानला घेऊन संजय लीला भन्साळी  ‘इंशाअल्लाह’ सिनेमा तयार करणार होते. आलिया या सिनेमाला घऊेन उत्साहीत देखील होती मात्र ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात गेला. आता हिंदुस्तान लाईव्हच्या रिपोर्टनुसार, आलिया संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई सिनेमात दिसणार. आलियाला संजय लीला भन्साळींच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आले. त्यामुळे ती गंगूबाईच्या मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. याआधी या सिनेमासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते. मात्र प्रियंकाचे शेड्यूल बिझी आहे. त्यामुळे हा सिनेमा आलियाच्या झोळीत आल्याचे समजतेय.    

आलियाने ‘सडक २’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. वर्षाअखेरीस ती ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. अयान मुखर्जी हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणे अपेक्षित आहे.

आलिया भट अनेक महिन्यांपासून रणबीर कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार  2020 च्या शेवटी दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. काही दिवसांपूर्वी आलियाने मुंबईतल्या जुहू परिसरात 13 कोटींचं आलिशान घरं खरेदी केलं त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर पकडला. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आलिया लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझायन केलेला लहंगा परिधान करणार आहे.   

टॅग्स :आलिया भट