Join us

​लवकरच कामावर परतणार संजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:21 IST

तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्तने आपले संपूर्ण लक्ष्य कामावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. काही दिवस कुटुंबीयांसोबत घालवल्यानंतर संजय लगेच कामावर ...

तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्तने आपले संपूर्ण लक्ष्य कामावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. काही दिवस कुटुंबीयांसोबत घालवल्यानंतर संजय लगेच कामावर परतणार आहे.  सिद्धार्थ आनंद यांच्या एका अ‍ॅक्शनपटाची शुटींग तो सुरू करणार आहे.‘बँग बँग’ चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले सिद्धार्थ आनंद प्रथमच संजय दत्तला घेऊन चित्रपट बनवत आहेत. सिद्धार्थ या चित्रपटाबद्दल अतिशय उत्साही आहे. आम्ही लवकरच चित्रपटाचे शुटींग सुरु करू. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित झाले नाही. मात्र ही एक अ‍ॅक्शन मुव्ही असेल, असे ते म्हणाले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजयचा हा पहिला चित्रपट असेल. संजय सामाजिक विषयावर आधारित उमेश शुक्लाच्या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे. सोबत इंद्रकुमार यांचा विनोदी चित्रपट ‘धमाल’ आणि ‘मुन्नाभाई’चा सिक्वेलही संजयच्या हाती आहे.