बॉलिवू़डचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळीं(Sanjay Leela Bhansali)च्या घरी पुन्हा एकदा आनंद वार्ता येणार आहे. त्यांची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सेहगल (Sharmin Segal) लवकरच आई होणार आहे. ही अभिनेत्री प्रेग्नेंट आहे आणि लवकरच तिच्या घरी पाळणा हलणार आहे. या बातमीनंतर तिचे चाहते खूप आनंदी आहेत आणि सोशल मीडियाद्वारे तिचे अभिनंदन करत आहेत. असे सांगितले जात आहे की ती सध्या तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि तिची प्रसूती लवकरच होणार आहे.
खरंतर, विकी लालवानी याने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'भन्साळी आणि सहगल यांच्या कुटुंबाच्या घरी एक आनंदाची बातमी येत आहे. शर्मिन लवकरच आई होणार आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
शर्मिन सहगल डिलिव्हरीनंतर इंडस्ट्रीत करणार कमबॅकशर्मिन सहगल सध्या गरोदरपणामुळे अभिनयापासून दूर आहे. ही माहिती देताना, कुटुंबाच्या जवळच्या मित्राने सांगितले की, प्रसूतीनंतर ती लवकरच कामावर परतेल. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिने लंडनमध्ये उद्योगपती अमन मेहताशी लग्न केले. लग्नाच्या दीड वर्षानंतर, हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहेत.
लग्नाचे फोटो शेअर करून दिली होती आनंदाची बातमीशर्मिनने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'आमचे लग्न झाले... एक परिपूर्ण फोटो शोधणे खूप कठीण काम आहे.' माझा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास क्षण जगत असता तेव्हा ते जपणेदेखील तितकेच महत्वाचे असते. पण ती एक भावना आहे आणि ती नेहमीच पकडता येत नाही, पण ती नेहमीच अनुभवता येते. ही नवीन सुरुवात असून एकत्रित येऊन प्रत्येक दिवस चांगला बनवण्याचा प्रयत्न आहे.
कोण आहे शर्मिन?अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती चित्रपट निर्माते दीपक सहगल आणि बेला भन्साळी यांची मुलगी आणि संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. ती २०२४ मध्ये 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमध्ये झळकली होती. तिने 'आलमझेब' ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले.