Join us
Daily Top 2Weekly Top 5

​करिश्माला अनोळखी पुरूषासोबत बघून भडकला संजय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:09 IST

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यात अलीकडे आपसी सहमतीने घटस्फोट झाला. पण कदाचित घटस्फोटानंतरही संजय करिश्माचा पिच्छा सोडायला तयार ...

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यात अलीकडे आपसी सहमतीने घटस्फोट झाला. पण कदाचित घटस्फोटानंतरही संजय करिश्माचा पिच्छा सोडायला तयार नाही. होय, लंडनमध्ये अलीकडे झालेल्या वादावरून तरी असेच दिसते. एका आॅनलाईन पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार, करिश्मा लंडनमध्ये आपल्या एका मित्रासोबत रेस्टॉरेंटमध्ये होती. योगायोगाने म्हणा, करिश्माचा माजी पती संजयही याठिकाणी होता. पण करिश्माला एका अनोळखी पुरुषासोबत पाहूनन संजय जाम चिडला आणि सगळ्यांसमोर करिश्माला भलेबुरे बोलू लागला. आता करिश्मा तुमची पत्नी राहिलेली नाही, असे करिश्मासोबत असलेल्या तिच्या मित्राने बजावल्यावर कुठे संजय शांत झाला आणि तेथून निघून गेला.