Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मनीषा कोईराला बनणार संजय दत्तची ‘आई’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 13:13 IST

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा अर्थात बायोपिकमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा म्हणजे संजयची आई नर्गिस दत्त. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या भूमिकेसाठी अभिनेत्री मनीषा कोईराला हिची निवड केली आहे.

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा अर्थात बायोपिक तयार होण्याआधीच चर्चेत आहे. तूर्तास तरी या बायोपिकची चर्चा रंगलीयं, ते एका वेगळ्या कारणाने. हे कारण म्हणजे, यातील स्टारकास्ट. आता स्टारकास्टबद्दल चर्चा व्हायचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. कारण यात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर तर मान्यता दत्तची भूमिका दीया मिर्झा साकारत असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे. पण याशिवाय या बायोपिकमध्ये आणखीही एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा म्हणजे संजयची आई नर्गिस दत्त.  नर्गिस यांची भूमिका कोण साकारणार, खरे तर हा उत्सुकतेचा विषय आहे. अर्थात ही उत्सुकता आता शमली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या भूमिकेसाठी अभिनेत्री मनीषा कोईराला हिची निवड केली आहे.नर्गिस यांचे १९८१ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते.  पडद्यावर त्यांची भूमिका साकारणार असलेली मनीषा कोईराला हिनेही अगदी लहान वयात या आजाराला यशस्वी झुंज दिली आहे. म्हणजेच मनीषा एक कॅन्सर सर्वाइव्हर आहे. यामुळे नर्गिस यांनी कर्करोगासारख्या आजाराशी दिलेली झुंज मनीषा योग्यप्रकारे समजू शकते. कदाचित याच विचाराने राजकुमार हिरानी यांनी या भूमिकेसाठी मनीषाची निवड केली. खरे तर मनीषाने संजयसोबत अनेक चित्रपटात काम स्क्रीन शेअर केलीय. यात ‘खौफ’,‘कारतूस’,‘सनम’,‘अचानक’,‘बागी’ व ‘महबूबा’ आदी चित्रपटांत मनीषा संजयची हिरोईन होती.  गत महिन्यात यानिमित्ताने राजकुमार हिरानी यांनी मनीषाची भेट घेतली होती. मनीषाने या भेटीचा साक्षीदार असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअरही केला होता. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये परेश रावल हे सुनील दत्त यांची भूमिका साकारणार आहेत. अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर या दोघी यात कॅमिओ करताना दिसणार आहेत.ALSO READ : मनीषा कोईराला नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही नेपाळी सुंदरी!इलूइलू गर्ल मनिषा कोईराला थायलंडमध्ये बीचवर करतेय एन्जॉय