Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूबाबाला मुलांच्या बाबतीत सतावते ही गोष्ट, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 20:25 IST

बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्याला दोन मुले असून त्यांची नावे शाहरान व इकरा अशी आहेत.

बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्याला दोन मुले असून त्यांची नावे शाहरान व इकरा असे आहे. त्या दोघांना नुकतेच आंतरशालेय स्विमिंग स्पर्धेत स्वर्ण पदक मिळाले. संजय दत्तला आपल्या मुलांनी कोणाच्याही दबावाखाली जीवन जगू नये असे वाटते.

 

संजय दत्तची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी सामान्य जीवन जगावे आणि स्टार किड्ससारखे कोणत्याही दबावाखाली आपले जीवन व्यतित केले नाही पाहिजे.

संजय दत्तने आपल्या बॉलिवूडमधील करियरमध्ये आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. यावर्षीदेखील त्याने चांगली सुरूवात करीत आतापर्यंत सहा चित्रपट साईन केले आहेत. आपल्या विभिन्न स्टाईलने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी संजूबाबा सज्ज झाला आहे.

गेल्या महिन्यात संजय दत्तचा कलंक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. मात्र त्याच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले. सध्या तो खूप व्यग्र आहे. या चित्रपटानंतर यावर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहे. एका पीरिएड ड्रामा चित्रपटात संजय दत्त बाल्ड लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील परफेक्ट लूकसाठी त्याला बरेच लूक व कॉश्च्युम ट्राय करावे लागले. 

रिपोर्टनुसार 'केजीएफ 2’मध्ये संजय दत्तची वर्णी लागली आहे. ‘केजीएफ2’मध्ये संजय एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल, असे कळतेय. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘केजीएफ2’मध्ये संजयची वर्णी लागलीच तर बाबासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

 ‘केजीएफ- चार्प्टर 1’ने वर्ल्डवाईड १५० कोटींचा बिझनेस केला होता. केजीएफ’चे हिंदी व्हर्जन फरहान अख्तरने प्रोड्यूस केले होते. कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषेत हा चित्रपट रिलीज झाला. आगामी काळात संजय दत्त शमशेरा, पानीपत, भुज: द प्राइड ऑफ इंडिया, प्रस्थान, सडक २ या सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :संजय दत्त