चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. पण, एका लोकप्रिय अभिनेत्याबद्दलची विचित्र गोष्ट ऐकून चाहत्यांनाही धक्का बसलाय. बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आपल्या गर्लफ्रेंड्सना थेट कब्रस्तानात घेऊन जायचा. त्यामागचं कारण तर अजूनच थक्क करणारं आहे.
तो बॉलिवूड अभिनेता आहे संजय दत्त. संजय दत्त हा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलाय. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगलेल्या असायच्या. त्याच्या आयुष्यातील एक विचित्र किस्सा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखतीत सांगितला, ज्यामुळे चाहतेही थक्क झाले आहेत.
राजकुमार हिरानींच्या म्हणण्यानुसार, संजय दत्त आपल्या गर्लफ्रेंड्सना कब्रस्तानात घेऊन जाऊन एका कबरीकडे बोट दाखवून म्हणायचा, "मी तुला माझ्या आईला भेटायला आणले आहे" हे ऐकून त्याच्या गर्लफ्रेंड्स खूप भावुक व्हायच्या आणि संजय दत्तवर अधिक विश्वास ठेवायच्या. मात्र, हिरानी यांनी खुलासा केला की, ती कबर त्याची आई नरगिस दत्त यांची नसून इतर कोणाची तरी असायची. अशा प्रकारे तो आपल्या मैत्रिणींवर प्रभाव पाडत असे. हा किस्सा संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मध्येही दाखवण्यात आला होता.
एका मुलाखतीत संजय दत्तने स्वतःच त्याच्या आयुष्यात ३०० पेक्षा जास्त मुली आल्याचे कबूल केले होते. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' हा बायोपिक २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची, तर परेश रावलने त्याचे वडील सुनील दत्त आणि मनीषा कोईरालाने त्याची आई नरगिस दत्त यांची भूमिका साकारली होती.