‘तोरबाज’च्या शूटिंगला संजय दत्त करणार सुरुवात; सेटवरील फोटो आला समोर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 18:55 IST
अभिनेता संजय दत्त त्याच्या आगामी ‘तोरबाज’ या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. होय, संजय दत्त आणि निर्माता तथा ...
‘तोरबाज’च्या शूटिंगला संजय दत्त करणार सुरुवात; सेटवरील फोटो आला समोर!!
अभिनेता संजय दत्त त्याच्या आगामी ‘तोरबाज’ या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. होय, संजय दत्त आणि निर्माता तथा व्हेव सिनेमाचे सीईओ राहुल मित्रा यांचा सेटवरील एक फोटो समोर आला असून, चित्रपटाचे शूटिंग उद्यापासून सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चित्रपटाचे शूटिंग किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे केली जाणार असून, संजूबाबाच्या अपोझिट अभिनेत्री नर्गिस फाखरी बघावयास मिळणार आहे. चित्रपटात नर्गिस एका एनजीओ वर्कर आयशाची भूमिका साकारणार आहे. आयशा अफगानिस्तानातील रिफ्यूजीमधील मुलांची देखभाल करीत असते. गिरीश मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून संजूबाबाला प्रचंड अपेक्षा आहेत. कारण कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या ‘भूमी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता, त्यामुळे हा चित्रपट संजूबाबाच्या करिअरच्यादृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण समजला जात आहे. दरम्यान, गिरीश मलिक यांनी २०१४ मध्ये ‘जल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामधील स्पेशल इफेक्ट्ससाठी राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. असे म्हटले जात आहे की, ‘तोरबाज’च्या स्क्रीप्टवर गिरीश गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहेत. दरम्यान, गेल्या मंगळवारीच संजय दत्त किर्गिस्तानला रवाना झाला होता. याठिकाणी चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग केले जाईल. शूटिंग नवीन वर्ष आणि ख्रिसमस काळातही सुरू राहील. शूटिंगविषयी निर्माता राहुल मित्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही बिश्केकमध्ये शूटिंग करणार आहोत. त्यानंतर मध्य एशियामागे सिल्क रूटवर ट्रॅव्हर करणार. चित्रपटाचे शूटिंग खूपच थंड हवामानाच्या ठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे चित्रपटात प्रेक्षकांना असे काही लोकेशन बघावयास मिळतील, जे यापूर्वी कधीच बघितले नाहीत. संजूबाबाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास तो या चित्रपटाव्यतिरिक्त त्याच्यावर आधारित ‘दत्त’ या बायोपिकमध्येही व्यस्त आहे. त्याच्या या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर त्याची भूमिका साकारणार आहे. तर नर्गिसविषयी सांगायचे झाल्यास, उदय चोपडाशी ब्रेकअप झाल्यानंतर ती या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतणार आहे.