Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तचा 'स्वॅग', मुंबईच्या रस्त्यांवर चालवला 'टेस्ला सायबरट्रक', किंमत पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:01 IST

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी गाड्या आहेत. यातच आता त्याने मुंबईच्या रस्त्यांवर टेस्ला सायबरट्रक चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टेस्ला सायबरट्रक अद्याप भारतात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध नाही. संजय दत्त चालवत असलेल्या गाडीवर दुबईची नंबर प्लेट असून, ती 'कार्नेट' परमिट अंतर्गत भारतात आणण्यात आल्याचे समजते. कार्नेट परमिट ही एक विशेष परवानगी आहे, ज्याद्वारे परदेशातील नोंदणीकृत वाहन ठराविक कालावधीसाठी साधारण ६ महिने भारतात चालवता येते. यासाठी कोणताही आयात शुल्क भरावा लागत नाही, मात्र मुदत संपल्यावर गाडी पुन्हा परदेशात पाठवणे बंधनकारक असते.

अमेरिकेत टेस्ला सायबरट्रकची मूळ किंमत सुमारे ७० ते ८५ लाख रुपये असली, तरी भारतात ती खाजगीरित्या आयात केल्यास त्याची किंमत ५ कोटी रुपयांच्या पुढे जाते. यामध्ये शिपिंग, सिक्युरिटी डिपॉझिट आणि इतर टॅक्सचा समावेश असतो.

काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये?या गाडीचे बाह्य कवच 'स्टेनलेस स्टील'पासून बनलेले असून ते अत्यंत मजबूत आणि बुलेटप्रूफ असल्याचा दावा केला जातो. याचा टॉप व्हेरियंट 'सायबरबीस्ट' केवळ २.६ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग गाठू शकतो. एका चार्जवर ही गाडी ५०० ते ५८० किलोमीटरपर्यंत धावू शकते. याचे डिझाइन कोणत्याही सायन्स-फिक्शन चित्रपटातील वाहनासारखे वाटते.

संजय दत्तचे अलिशान गॅरेजसंजय दत्तकडे आधीच रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज-मेबॅक GLS 600, लँड रोव्हर डिफेंडर आणि रेंज रोव्हर SV सारख्या २० कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या आहे. आता यात टेस्ला सायबरट्रकची भर पडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Dutt's Tesla Cybertruck Ride Turns Heads, Price Stuns

Web Summary : Sanjay Dutt drove a Tesla Cybertruck in Mumbai, grabbing attention. The car, with Dubai plates, entered India via a 'Carnet' permit. While the Cybertruck costs around ₹70-85 lakhs in the US, importing it privately to India can exceed ₹5 crore. Dutt's garage already boasts cars worth over ₹20 crore.
टॅग्स :संजय दत्तबॉलिवूड