Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या बहिणीने पाहिला ‘संजू’; पण आवडली नाहीत ही दोन पात्रं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 12:04 IST

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम लाभले. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. पण संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिला विचाराल तर, यातील दोन पात्रांनी तिना नाराज केले.

‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे अनेक विक्रम मोडीस काढलेत. अद्यापही या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड सुरु आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम लाभले. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. पण संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिला विचाराल तर, यातील दोन पात्रांनी तिना नाराज केले.होय, स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत नम्रताने आपली ही नाराजी बोलून दाखवली.

 ‘संजू’ पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया तिला विचारण्यात आली आणि नम्रताने अगदी प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवली.  ‘मी ‘संजू’ पाहिला. या चित्रपटात संजयच्या आयुष्यातील अनेक घटना दाखवल्या गेल्यात. खरे सांगायचे तर ‘संजू’वर प्रतिक्रिया देणे माझ्यासाठी सोपे नाही. पण एक गोष्ट मी आवर्जुन नमूद करेल, ती म्हणजे रणबीरने या चित्रपटात कौतुकास्पद काम केलेयं. चित्रपटात संजूचे ड्रग्जचे व्यसन, त्याचा तुरुंगवास सगळे काही यात आहे. त्याकाळात पापा कायम संजूच्या पाठीशी होते. पापासाठी तो प्रचंड कठीण काळ होता. दोघेही लढाऊ बाण्याने त्या प्रसंगांना सामोरे गेलेत. पापा आणि संजू एकमेकांचे सपोर्ट सिस्टीम बनून वागलेत. पण ‘संजू’तील माझ्या पापाची भूमिका मला आवडली नाही. कारण त्यांची भूमिका कुणीच साकारू शकत नाही. ते माझ्यासाठीचं नाहीत तर आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत खास आहेत,’ असे नम्रता म्हणाली.

आई नरगिसच्या भूमिकेतील मनीषा कोईरालाचा अभिनयही नम्रताच्या मनाला फार भावला नाही. ‘मम्मा पापाची भूमिका साकारणे कठीण आहे. हे दोन्हीही आयकॉनिक रोल आहेत. अर्थात प्रेक्षकांना या दोन्ही भूमिका आवडल्यात, ही आनंदाची गोष्ट आहे,’असे ती म्हणाली.

‘संजू’मधील संजयच्या मित्राच्या भूमिकेवरही ती बोलली. ती म्हणाली की, चित्रपटातील विकी कौशलने साकारलेली संजूच्या मित्राची भूमिका कुण्या एका मित्राची नव्हतीच. त्याच्या अनेक मित्रांच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारे हे पात्र होते. पण विकीने ही भूमिका उत्तम वठवली. संजयने खूप काही बघितले. त्याचे तुरुंगात जाणे आमच्या कुटुृंबावरचा मोठा भावनिक आघात होता. तो सुटला तेव्हा पापा या जगात नव्हते. आज संजयला सामान्य आणि स्वतंत्र आयुष्य जगताना पाहून त्यांना खूप आनंद झाला असता, असेही नम्रता म्हणाली.

टॅग्स :संजय दत्त