Join us

रोज सकाळी दारूनेच गुळणी करायचा ​संजय दत्त! महेश भट्ट यांनी केला धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 10:23 IST

संजय दत्तसोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अलीकडे काही धक्कादायक खुलासे केलेत. होय, संजय दत्तच्या खासगी ...

संजय दत्तसोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अलीकडे काही धक्कादायक खुलासे केलेत. होय, संजय दत्तच्या खासगी आयुष्याबद्दल महेश भट्ट बोलले. ‘भट्ट नॅचरली’ या रेडिओ शोवर महेश भट्ट यांनी व्यसन आणि त्यापासून मुक्ती या विषयाला हात लावला. याच अनुषंगाने त्यांनी आपल्या जीवनातील अनेक कटू अनुभव शेअर केलेत. याच क्रमात महेश भट्ट  यांनी संजय दत्तचा विषय छेडला आणि  त्याच्याबद्दल बोलताना अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या. एक काळ असा होता, जेव्हा संजय दत्त सकाळी उठल्याबरोबर दारूनेच गुळणी करायचा. सकाळी उठल्या उठल्या त्याच्या मनात पहिला विचार यायचा तो ड्रग्जचा. ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडणे संजयसाठी सोपे नव्हते. हे व्यसन सोडवणे त्याला बरेच कठीण गेले, असे महेश भट्ट यांनी या शोवर सांगितले.  महेश भट्ट व संजय दत्त यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. यात ‘कब्जा’,‘दुश्मन’ आणि ‘सडक’ या चित्रपटांचा समावेश आहे. लवकरच संजयच्या ‘सडक’चा सीक्वल बनणार असल्याचीही खबर आहे. यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहे. संजय दत्तही या सीक्चलमध्ये दिसणार असल्याची खबर आहे.  संजय दत्तच्या आयुष्यावरीज बायोपिकही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २९ जूनला संजयचे हे बायोपिक रिलीज होणार असल्याचे कळतेय.ALSO READ : OMG! ​रणबीर कपूरने ऐनवेळी सुचवले संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बदल! जाणून घ्या का?या शोमध्ये महेश भट्ट स्वत:बद्दलही बोलले. माझी मुलगी पूजा हिचा जन्म झाला तेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटायला गेलो. ती जणू राजकुमारी होती. मी तिला माझ्या हातांवर घेतले अन् हृदयाशी कवटाळले. पण दारूच्या भपकाºयाने तिचे लगेच मान वळवली. त्यादिवशीपासून मी दारू कायमची सोडली, असे महेश भट्ट म्हणाले.