Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आई तुझी आठवण येतेय", नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:00 IST

आईच्या आठवणीत संजय दत्त भावुक, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

नर्गिस दत्त यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. अभिनयाबरोबरच चर्चा व्हायची ती त्यांच्या सौंदर्याची. भल्याभल्यांना भुलवेल असं त्यांचं सौंदर्य होतं. अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर ३ मे १९८१ साली नर्गिस यांनी या जगाचा निरोप घेतला. कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आईच्या आठवणीत संजय दत्त भावुक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर नर्गिस यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. 

संजय दत्त हा सुप्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यानेदेखील अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. नर्गिस यांचं निधन झाल्यानंतर संजय दत्त नैराश्यात गेला होता. आज त्यांच्या डेथ अनिव्हर्सरीच्या दिवशी त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. "आई तुझी आठवण येतेय. तू जरी आमच्याबरोबर नसलीस तरी तुझा सहवास आम्हाला जाणवतो. आमच्या हृदयात आणि आठवणीत तू कायम आहेस. लव्ह यू", असं  त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्याआधी नर्गिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. १९५८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांनी संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत. 

टॅग्स :संजय दत्तनर्गिससेलिब्रिटी