संजय दत्तची जुळ्या मुलांसह पत्नी मान्यतासोबत स्कूटर राईड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 17:17 IST
संजय दत्त आपल्या भूमी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र अशा स्थितीतही तो आपल्या कुटुंबाला विसरला नाही. पत्नी मान्यतासोबत जुळी मुले शाहरान आणि इकरा यांच्यासोबत त्याने केलेल्या स्कूटर राईडचा फोटो मान्यताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
संजय दत्तची जुळ्या मुलांसह पत्नी मान्यतासोबत स्कूटर राईड
संजय दत्त आपल्या भूमी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र अशा स्थितीतही तो आपल्या कुटुंबाला विसरला नाही. पत्नी मान्यतासोबत जुळी मुले शाहरान आणि इकरा यांच्यासोबत त्याने केलेल्या स्कूटर राईडचा फोटो मान्यताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘स्कूटरवरून कुटुंबासह साधी चक्कर मारण्याची बरोबरी कशातही नाही’ असे मान्यताने म्हटले आहे. आग्रा येथे हा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोत हे संपूर्ण कुटुंब आनंदी दिसते आहे. ‘शाहरान आणि इकरा या दोघांनी पांढरे कपडे घातले असून, त्यांनी रिफ्लेक्टर गॉगल्स घातले आहेत. मान्यतानेही छान असा कुर्ता परिधान केला आहे.’ ‘माझ्या कुटुंबासह स्कूटवरील हे आयुष्य खूप सुंदर आहे. आग्रा येथे भूमी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. माझ्या कुटुंबासह मी’ असेही तिने लिहिले आहे.भूमी या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार हे करीत आहेत. मेरी कोम या राष्टÑीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. येरवडा जेलमधून आल्यानंतर संजय दत्त करीत असलेला हा पहिला चित्रपट आहे.