Join us

‘संजू’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी! ‘या’ अटीवर दिली परवानगी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 17:55 IST

गत ९ दिवसांत ‘संजू’ने २३४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पण मेकर्सला ‘संजू’च्या या कमाईतील काही हिस्सा अभिनेता संजय दत्त यालाही द्यावा लागणार आहे.

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. गत ९ दिवसांत ‘संजू’ने २३४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पण मेकर्सला ‘संजू’च्या या कमाईतील काही हिस्सा अभिनेता संजय दत्त यालाही द्यावा लागणार आहे. होय, कारण आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यासाठी संजयने कोट्यवधी रूपये घेतले. शिवाय चित्रपटाच्या नफ्यातील काही वाटाही त्याने घेतला, ताज्या माहितीनुसार, संजय दत्तने या चित्रपटासाठी ९ ते १० कोटी रूपये घेतले. शिवाय चित्रपटाच्या कमाईचा काही भागही त्याने मागितला. याच अटीवर त्याने आपले आयुष्य पडद्यावर साकारण्यास परवानगी दिली.अलीकडे एका मुलाखतीत बोलताना ‘संजू’चे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी संजयच्या आयुष्यावर चित्रपट बनण्याची कल्पना कशी सुचली, ते सांगितले होते. कुठलाही मेकर्स सतत चांगल्या कथेच्या शोधात असतो. मी सुद्धा होतो. चांगल्या कथेच्या लालसेनेचं आम्ही या कथेपर्यंत पोहोचलो, असे त्यांनी सांगितले होते.या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. रणबीरच्या यातील अभिनयाचे सध्या जोरदार कौतुक होत आहे.  ‘संजू’हा रणबीरच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला आहे.बॉक्सआॅफिसवरील कलेक्शनबदद्ल सांगायचे तर पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण २०२. ५१ कोटी रूपये कमावले. यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी १२.५० कोटी, दुस-या शनिवारी २१.२५ कोटींचा गल्ला जमवला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘रेस3’ आणि ‘बागी2’ या चित्रपटांना धूळ चारली. या चित्रपटाचा बजेट १०० कोटी रूपये होता. हे १०० कोटी चित्रपटाने कधीचेच वसूल केले आहेत.

टॅग्स :संजय दत्त