Join us

संजय दत्तने या दिग्दर्शकासोबत काम करण्यास दिला नकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 12:14 IST

हे तर सगळ्यांना माहितीच आहे की संजय दत्त ओमांग कुमारच्या भूमी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. संजय दत्तच्या या ...

हे तर सगळ्यांना माहितीच आहे की संजय दत्त ओमांग कुमारच्या भूमी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. संजय दत्तच्या या चित्रपटातून खूप अपेक्षा होत्या मात्र त्यावर पाणी फिरले. भूमी बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच फ्लॉप झाला. यानंतर अशी चर्चा ऐकायला मिळाली की संजय दत्त चित्रपट निवडताना खूप सतर्क झाला आहे. चर्चा तर अशी पण रंगली आहे की भूमी फ्लॉप झाल्यानंतर संजयने ओमांग कुमारच्या द गुड महाराजा चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार संजय दत्त दिग्दर्शक ओमांग कुमारच्या द गुड महाराजा चित्रपटाचा भाग नसणार आहे. संजू बाबाने ओमांगसोबत भूमी चित्रपटात काम केले आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. सध्या संजय दत्त तिग्मांशु धूलियाच्या 'साहेब बिवी और गँगस्टार 3'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.   मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त सध्या त्याच्या होम प्रॉडक्शन लक्ष केंद्रीत करु इच्छित आहे. लवकरच तो मल्याळम चित्रपट प्रस्थानमचा रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरु होऊ शकते. याआधी संजय दत्त तारेबाज चित्रपटाची शूटिंग संपवणार आहे. यात तो एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ALSO READ :  संजूबाबाच्या बायोपिकने वाढवली मान्यता दत्तची चिंता? रणबीर कपूरचा वाढला वैताग?संजय दत्त याशिवास सडक 2 मध्ये सुद्धा दिसणार आहे. महेश भट्टच्या म्हणण्यानुसार या स्टेजवर संजय दत्तसाठी सडक 2 हा चित्रपट अगदी योग्य आहे. सडक 2 हा चित्रपट संजय दत्तला बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास मदत करेल. या चित्रपटाची स्क्रिप्ट ही तयार आहे. लवकरच संजय बाबा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. साहेब बिवी और गँगस्टर 3 मध्ये अभिनेत्री नफिसा अली संजय दत्तच्या आईची भूमिका साकारताना दिसेल तर अभिनेता कबीर बेदी चित्रपटात संजय दत्तच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. यात संजय दत्त एक गँगस्टरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. वास्तवमध्ये एका गँगस्टरची भूमिका संजय दत्तने साकारली होती आणि ती प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली होती. वास्तवनंतर पुन्हा एक गँगस्टर मोठ्या पडद्यावर साकारायला संजूबाबा तयार झाला आहे.