Sanjay Dutt's Fan's Property: बॉलिवूडचा 'बाबा' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) पुन्हा एकदा चर्चेत आहे. संजय दत्तचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सेटवर, किंवा त्यांच्या घराच्या बाहेर चाहते थांबताना दिसतात. एका चाहतीनं तर तिची तब्बल ७२ कोटी रुपयांची संपत्ती थेट संजय दत्तच्या नावे केली होती. अशातच आता खुद्द संजय दत्तनं या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. त्या पैशांचं पुढे काय झालं हे अभिनेत्यानं सांगितलं. त्याचा हा खुलासा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
नुकतंच संजय दत्त याने 'कर्ली टेल्स'शी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याला विचारण्यात आलं की, एका चाहतीनं तिची ७२ कोटींची संपत्ती त्याच्या नावे केली होती, तर हे खरं आहे का? संजय दत्तनं या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर त्याला त्यानं या पैशांचं काय केलं? असं विचारलं असता तो म्हणाला, "मी ते सगळ पैसे तिच्या कुटुंबाला परत दिले". दरम्यान, संजयच्या प्रामाणिकपणाचं चाहते कौतुक करत आहेत.
कोण होती ती चाहती?
२०१८ मध्ये, एकदा संजय दत्तला पोलिसांचा फोन आला. त्यांनी संजयला सांगितलं की एका महिला चाहतीने त्याच्या नावावर ७२ कोटी केले आहेत. निशा पाटील असं संजयच्या चाहतीचं नाव होतं. निशाने आपल्या मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केल्याचं वकिलांनी सांगितलं. तिने बँकेला अनेक पत्रे लिहून तिची संपूर्ण मालमत्ता संजय दत्तच्या नावावर करण्याची विनंती केली होती. हे कळताच संजय दत्तला धक्का बसला होता.
संजय दत्तची एकूण संपत्ती किती?
संजय दत्तच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचं झालं तर ती जवळपास २९५ कोटींची आहे. तर एका चित्रपटासाठी तो जवळपास ८ ते १५ कोटी घेतो. मुंबईत असलेल्या त्याच्या घराची किंमत ही ४० कोटींच्या आसपास आहे. त्यासोबत दुबईमध्ये एक आलिशान घर देखील आहे. इतकंच नाही तर कार कलेक्शनसोबत बाइकचं देखील खास कलेक्शन आहे. संजय दत्तचा स्वतःचा व्हिस्की ब्रँड 'ग्लेनवॉक' आहे. तर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त ही एक उद्योजिका आणि संजय दत्त प्रॉडक्शनची सीईओ आहे.