Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट असणारा संजय दत्त आता करतोय 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 09:55 IST

ड्रग्स सोबतचा संजय दत्तचा संघर्ष त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट 'संजू'मध्ये पाहायला मिळाला होता. या बायोपीकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती.

ठळक मुद्देसंजय दत्तचा ड्रग्ससोबतचा संघर्ष पाहायला मिळाला संजू बायोपीकामध्ये

ड्रग्स सोबतचा संजय दत्तचा संघर्ष त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट 'संजू'मध्ये पाहायला मिळाला होता. या बायोपीकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती.

अभिनेता संजय दत्त नेहमीच आपल्या ड्रग्स संघर्षाबद्दल बोलताना दिसतो. आता तर तो एका नशा विरोधी मोहिमेचे समर्थन करतो आहे. संजय दत्तने नुकतेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या ड्रग फ्री इंडिया मोहिमेला सोशल मीडियावरून समर्थन दिले आहे. 

संजय दत्तने लिहिले की,' मला नेहमीच भारत ड्रग्स मुक्त करण्यासाठी काहीतरी करायचे होते. त्यासाठी ड्रग्स फ्री इंडिया मोहिम हे उचललेले पहिले पाऊल आहे. मला आलेल्या व्यक्तिगत अनुभवामुळे हा मुद्दा माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि त्यामुळे होणारे नुकसान मला माहित आहे. मला देशातील तरूणांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढायचे आहे.'

संजय दत्तचा ड्रग्ससोबतचा संघर्ष 'संजू' बायोपीकमध्ये पाहायला मिळाला. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या ड्रग्स मुक्त मोहिमेत संजय दत्त व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, कपिल शर्मा, परिणीती चोप्रा, बादशाह व वरूण शर्मा यांसारखे प्रसिद्ध व्यक्ती या मोहिमेत सहभागी होणार आहे. ८ फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरूवात होणार आहे.

टॅग्स :संजय दत्तसंजू चित्रपट 2018