Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तला ‘भूमी’च्या निर्मात्यांनी दिले बर्थ डे गिफ्ट; रिलीज केले नवे पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:43 IST

आगामी कमबॅक ‘भूमी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला एक खास बर्थ डे गिफ्ट दिले असल्याने संजूबाबा चांगलाच आनंदी आहे.

आज बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याचा वाढदिवस असून, त्याच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. संजूबाबासाठीदेखील हा वाढदिवस स्पेशल असून, तो आजचा दिवस अविस्मरणीय करण्यास उत्सुक आहे. दरम्यान, त्याच्या आगामी कमबॅक ‘भूमी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला एक खास बर्थ डे गिफ्ट दिले असल्याने संजूबाबा चांगलाच आनंदी आहे. होय, संजूबाबाच्या वाढदिवसानिमित्त ‘भूमी’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये संजूबाबाचा अवतार खूपच डॅशिंग आणि रागीट दिसत आहे. कारण पोस्टरमध्ये संजूबाबाचा चेहरा धुळीने माखलेला असून, चेहºयावर सर्वत्र रक्त दिसत आहे. शिवाय तो भयंकर रागात दिसत आहे. हे पोस्टर रिलीज होताच ट्विटरवर #Bhoomi या हॅशटॅगने टॉप ट्रेण्ड केले जात आहे. संजय दत्तचे चाहते तर हे पोस्टर बघून खूपच आनंदी असून, संजूबाबावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. या अगोदरदेखील ‘भूमी’चे एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये संजय दत्तचा चेहरा रक्तबंबाळ झाल्याचे दिसत होते. परंतु त्यामध्ये संजूबाबाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. आताच्या पोस्टरमध्ये मात्र संजूबाबाचा चेहरा दिसत आहे. या चित्रपटात संजय दत्तसोबत अभिनेत्री आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. संजूबाबा या चित्रपटाविषयी खूपच उत्सुक आहे. चित्रपटात संजय दत्त एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. जेव्हा ‘भूमी’चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते, तेव्हा हे पोस्टर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. फोटो ओळींमध्ये मान्यताने लिहिले होते की, ‘आयुष्यात पडणे हे नेहमी नव्या भरारीने उठण्यासाठी असते. कारण तुम्ही जे आहात, त्यापेक्षाही तुम्ही चांगले बनून आयुष्य जगू शकता ही ईश्वराचीच इच्छा असते. दरम्यान, संजूबाबाने २०१६ मध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर ‘भूमी’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. अखेरीस तो आमिर खान याच्या ‘पीके’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता.  या चित्रपटाविषयी काही दिवसांपूर्वीच संजय दत्तने सांगितले होते की, ‘भूमी’ एक संवेदनशील, ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. ‘मेरी कॉम’, ‘सरबजीत’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या ओमंग कुमार यांना ‘भूमी’ या चित्रपटातून बºयाचशा अपेक्षा आहेत. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.