Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीला हेच संस्कार दिलेत का? युजरचा सवाल बघून खवळली संजय दत्तची लेक त्रिशाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 10:37 IST

युजर्सच्या कमेंट वाचून त्रिशालाचा पारा चढला. इतका की, ट्रोल करणा-या एका युजरला तिने चांगलेच सुनावले.

ठळक मुद्देत्रिशाला ही संजय व त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची लेक त्रिशाला दत्त सध्या जाम खवळलीय. होय, त्रिशालाने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि या फोटोवरून युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. युजर्सच्या कमेंट वाचून त्रिशालाचा पारा चढला. इतका की, ट्रोल करणा-या एका युजरला तिने चांगलेच सुनावले.त्रिशाला दत्त कायम तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून एका युजरने तिला ट्रोल केले. इतकेच नाही तर तिचे संस्कारही काढलेत.

 

‘मी हे पाहून हैराण आणि निराश आहे. तू स्वत: एक डॉक्टर आहेस. अशात न्यूयॉर्कमध्ये 40% कोरोना संक्रमित केस असताना सुद्धा तू मास्क न लावता आणि लहान कपडे घालून रस्त्यावर उभी आहेस. तुला फॉलो करणा-या लोकांना तू काय सांगू इच्छिते? तुझा बॉयफ्रेंड गेल्यावर जशी तू रडत होतीस तशी वेळ तुझ्या वडीलांवर यावी असे तुला वाटतेय का?,’ असे या युजरने लिहिले. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये या युजरने संजय दत्तला सुद्धा टॅग केले. शिवाय ‘संजय दत्त तुम्ही मुलीला हेच शिकवले का? हेच संस्कार दिलेत का? ज्यात काही कॉमन सेन्सच नाही. माझा सल्ला आहे की घरी राहा शांत राहा आणि आराम करा,’ असेही त्याने लिहिले.

युजरची ही कमेंट वाचल्यावर त्रिशाला चांगलीच भडकली. मग तिनेही या युजरला सडेतोड उत्तर दिले. तिने लिहिले,‘ तुम्ही मला जनरल नॉलेज देत आहात? पण कॅप्शन वाचले असते तर कदाचित तुम्हालाच थोडेसे जनरल नॉलेज मिळाले असते. TBTचा अर्थ आधी जाणून घ्या. हा फोटो जुना आहे. खूप आधी क्लिक केलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो.  माझ्या पेजवर येऊन अशा फालतु गोष्टी लिहिण्यआधी मी दिलेले कॅप्शन नीट वाचा. अशा फालतु पोस्टमध्ये माझ्या वडिलांना टॅग करण्याचा जराही फायदा नाही. पण तुम्ही चांगला प्रयत्न केला...’ अर्थात यानंतर त्रिशालाने हा फोटो डिलीट केला.

त्रिशाला ही संजय व त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. ऋचा शमाचे1996 मध्ये ब्रेन ट्यूमरने निधन झाले होते. त्रिशालाचे पालन-पोषण तिच्या आजी-आजोबांनी केले़ सध्याही ती त्यांच्यासोबत अमेरिकेत राहते.  

टॅग्स :संजय दत्त