Sanjay Dutt Buys Brand New Luxury Mercedes: बॉलिवूडचा 'बाबा' म्हणजेच संजय दत्त त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. नुकतेच त्यानं आपल्या कार कलेक्शनमध्ये एका नव्या महागड्या गाडीची भर घातली आहे. संजय दत्तने नवी कोरी मर्सिडीज मेबॅक GLS600 गाडी खरेदी केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संजय दत्तने ही आलिशान कार खरेदी केली. या गाडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त त्याच्या मुंबईतील घराबाहेर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या चकचकीत गाडीसोबत दिसत आहेत. यावेळी संजय दत्त कॅज्युअल लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होता. गाडीच्या बोनेटवर आणि ग्रिलवर झेंडूच्या फुलांची माळ घातलेली असून, गाडीचा लूक अधिक आकर्षक वाटतोय. संजय दत्तच्या या नव्या मर्सिडीज मेबॅक GLS600 ची किंमत तब्बल ३.७१ कोटी रुपये आहे.