Join us
Daily Top 2Weekly Top 5

विंटेज कार, दाढी अन् कपाळी गंध! वाढदिवशीच संजय दत्तच्या नव्या सिनेमातील किल्लर लूक चाहत्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:11 IST

आज वाढदिवशी संजय दत्तने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. संजू बाबाच्या नवीन सिनेमातील लूक समोर आला आहे. 

बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. 'मुन्नाभाई MBBS', 'खलनायक', 'वास्तव', 'केजीएफ २', 'अग्नीपथ', 'गुमराह', 'कलंक' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्याने बॉलिवूडमध्ये जम बसवला. संजय दत्त अभिनयाबरोबरच त्याच्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. आज वाढदिवशी संजय दत्तने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. संजू बाबाच्या नवीन सिनेमातील लूक समोर आला आहे. 

संजूबाबा 'केडी-द डेव्हिल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो धक देवा हे पात्र साकारणार आहे. या चित्रपटातील संजय दत्तच्या पात्राची पहिली झलक त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आली आहे. संजूबाबाने त्याच्या सोशल मीडियावरुन त्याचा सिनेमातील खुंखार लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्तचा नवा लूक पाहायला मिळत आहे. मागे गाडी आणि पुढे गॉगल लावून टोपी घातलेला डॅशिंग अंदाजात असलेला संजूबाबा दिसत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. 

या सिनेमाबद्दल संजय दत्त म्हणाला, "मी 'केडी -द डेव्हिल'चा एक भाग बनण्यास उत्सुक आहे. प्रेम सरांनी चित्रपटाच्या जगाची कल्पना कशी केली हे मला आवडते. हा एक ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट आहे. आणि या प्रकल्पासाठी इंडस्ट्रीतील काही सर्वोत्कृष्ट विचारांच्या टीमचा एक भाग असल्याचा मला आनंद वाटतो."

संजय दत्तबरोबरच 'केडी - द डेव्हिल' या सिनेमात शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद, व्ही रविचंद्रन आणि ध्रुवा सर्जा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 1970 च्या बंगलोरमधील सत्य घटनांवर आधारित ऐतिहासिक ॲक्शन एंटरटेनर, 'केडी - द डेव्हिल' KVN प्रॉडक्शन प्रस्तुत आणि प्रेम यांनी दिग्दर्शित केला आहे. हा बहुभाषिक चित्रपट तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :संजय दत्तसेलिब्रिटी