Join us

'पाकिस्तानी क्रिकेटर फक्त बायकोची खिल्ली उडवतात'; घटस्फोटानंतर सानियाचं मोठं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:05 IST

Sania mirza: सध्या सोशल मीडियावर सानियाचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक या जोडीचा नुकताच घटस्फोट झाला आहे. शोएबने सानियाला डिवोर्स देऊन त्याने सना जावेद हिच्यासोबत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्येच सानिया आणि शोएब यांचे जुने इंटरव्ह्यू सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आहेत. यामध्येच सानियाने एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांच्या पत्नींना कशा प्रकारे वागणूक देतात हे सांगितलं आहे.

शोएबसोबत घटस्फोट घेणारी सानिया सध्या तिच्या ५ वर्षाच्या मुलासोबत दुबईमध्ये राहत आहे. मात्र, तिच्या या घटस्फोटाची चर्चा सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये रंगली आहे. यामध्येच सानिया-शोएबची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्येच पाकिस्तानी क्रिकेटर फक्त पत्नींची चारचौघात खिल्ली उडवतात, असं तिने म्हटलं आहे."आमच्या इथे जन्म झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक जण प्रेम करतो. त्यानंतर मग दमदाटी करायला सुरुवात होते", असं शोएब म्हणाला.  तो बोलत असताना सानियाने त्याला मध्ये थांबवलं आणि, पाकिस्तानी क्रिकेटर्सविषयी मोठं भाष्य केलं.

 

नेमकं काय म्हणाली सानिया?

"पाकिस्तानी क्रिकेटर्स फक्त त्यांच्या बायकांची खिल्ली उडवतात. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सर्वात मोठा आवडता छंद म्हणजे स्वत:च्या पत्नीची खिल्ली उडवणं", असं सानिया म्हणाली. दरम्यान, सानियाची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. तर, दुसरीकडे शोएब ट्रोल होत आहे. शोएबने सानियाला घटस्फोट देत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकसेलिब्रिटी