संगीताला वाटतेयं ‘अजहर’ची भीती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 17:30 IST
‘अजहर’ या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत असल्याने एकीकडे भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन जाम खूश आहे, ...
संगीताला वाटतेयं ‘अजहर’ची भीती!!
‘अजहर’ या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत असल्याने एकीकडे भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन जाम खूश आहे, दुसरीकडे त्याची एक्स वाईफ संगीता बिजलानी हिला भीतीने ग्रासले आहे. या चित्रपटाने ‘संसार मोडणारी बाई’ अशी आपली प्रतीमा निर्माण तर होणार नाही ना, अशी भीती तिला सतावते आहे. ‘अजहर’ हा मोहम्मद अझहरूद्दीच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे. संगीता ही अझहरूद्दीनची दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी असतानाच संगीता बिजलानीसोबतच्या अफेअरनंतर अझहरूद्दीनने तिच्यासोबत लग्न केले होते. ‘अजहर’मध्ये नरगिस फाखरी संगीताची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर इमरान हाश्मी अझहरूद्दीनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अजहर’च्या रिलीजमुळे संगीता जराही आनंदात नाही. या चित्रपटाने अझहरूद्दीनसोबत तिने घालवलेल्या क्षणांच्या आठवणीं पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटाने आपली चुकीची इमेज निर्माण होऊ शकते, अशी भीती तिला वाटत आहे. चित्रपटामुळे स्वत:च्या प्रतिमेस जराही धक्का लागला तर त्याविरूद्ध कोर्टात जाण्याचाही तिचा विचार आहे.