Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरचा डबल धमाका! कसं असेल कथानक? 'ॲनिमल पार्क' दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:22 IST

'ॲनिमल पार्क'चं शूट कधी सुरु होणार? संदीप रेड्डी वांगा म्हणाले...

याची झलक दाखवली होती. तर आता दुसऱ्या पार्टवर वांगा यांनी नुकतीच अपडेट दिली आहे.संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमाने मोठं यश मिळवलं होतं. सिनेमात रणबीर कपूरचा कधीही न पाहिलेला अवतार दिसला होता. सिनेमाच्या शेवटी याचा दुसरा पार्टही येणार 'ॲनिमल पार्क' असं दुसऱ्या पार्टचं नाव असणार आहे. याचं शूटिंग कधी सुरु होणार यावर वांगा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'ॲनिमल पार्क'बद्दल बोलताना संदीप रेड्डी वांगा म्हणाले,"सध्या माझा एक सिनेमा सुरु आहे त्याचं काम झालं की लगेच 'ॲनिमल पार्क'चं शूटिंग सुरु केलं जाईल. यात आणखी बरेच ॲनिमल असणार आहेत कारण अजीज हा सुद्धा एक ॲनिमलच आहे. हे बघता आता दिसायला सारख्याच असलेल्या दोन भावांची ही गोष्ट असणार आहे. म्हणूनच मला वाटलं की 'ॲनिमल पार्क' हे योग्य शीर्षक असेल." 

यावेळी रणबीर कपूरनेही सिनेमावर भाष्य केलं आणि सिनेमाबद्दलची उत्सुकता दर्शवली. तो म्हणाला, "संदीपसोबत सेटवर परत येण्यासाठी आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उत्साहित आहे. यावेळी तर दोन भूमिका असणार आहेत. ही एक निरंतर गोष्ट असल्याने पहिल्या पार्टच्या शूटवेळीच संदीपच्या डोक्यात दुसऱ्या पार्टची कथा होती. अभिनेता म्हणून माझ्यासाठी हे खूप रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. आम्ही दोघंही सतत सिनेमावर बोलत असतो आणि वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करत असतो."

'ॲनिमल' १ डिसेंबर २०२३ साली रिलीज झाला होता. आता सुमारे दोन वर्षांनी हा सिनेमा जपानमध्ये रिलीज होत आगे. १३ फेब्रुवारी रोजी जपानमध्ये सिनेमाच्या रिलीजआधी एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यासाठी संदीप वांगा आणि रणबीर कपूर यांनी हजेरी लावली होती. वांगा सध्या प्रभास आणि तृप्ती डिमरीच्या 'स्पिरिट' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. नंतर ते 'ॲनिमल पार्क'वर काम करणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir's Double Dose! 'Animal Park' Story Revealed by Vanga.

Web Summary : Sandeep Reddy Vanga reveals 'Animal Park' will feature Ranbir in dual roles. The film explores the story of two identical brothers. Ranbir expresses excitement, confirming the sequel's genesis during the first film's production. Vanga will begin after 'Spirit'.
टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूड