बॉलिवूडमध्ये सध्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. तर दुसरीकडे काही लोक या चित्रपटाला 'प्रोपगंडा' म्हणत आहेत. अशातच आता 'ॲनिमल' चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने 'धुरंधर : द रिव्हेंज'चं कौतुक केलं. तसेच चित्रपटावर प्रोपोगंडा म्हणून टीका करणाऱ्यांनाही कडक शब्दात सुनावलं. संदीप रेड्डी वांगाचा हा थेट पाठिंबा मिळाल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धरनेही कृतज्ञता व्यक्त करत त्याचे जाहीर आभार मानले आहेत.
आदित्य धरनं X (ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना वांगांच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं. त्यानं लिहिलं की, "प्रिय संदीप, मला हे खरंच खूप आवडतं की तू ज्याप्रकारे आपल्या भूमिकेवर ठाम राहतोस. त्यामध्ये एक प्रामाणिकपणा आणि ठाम विश्वास दिसतो, ज्याचा मला खूप आदर आहे. तुझं सिनेमाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं मी नेहमीच कौतुकाने पाहिलंय. असा ठाम विश्वास आपल्याला स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवायला आणि निर्धाराने पुढे जाण्याची प्रेरणा देतो", असं आदित्य धरनं म्हटलं.
पुढे आदित्यनं प्रभासला 'लेजेंड' संबोधत वांगांच्या आगामी 'स्पिरिट 'चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. गरज पडल्यास मदतीसाठी आपण तयार असल्याचं सांगितलं. आदित्य म्हणाला, "'स्पिरिट'साठी खूप शुभेच्छा. त्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय. आणि कधीही माझ्याकडून काही मदत लागली, तर नक्की सांग, मी मनापासून मदत करायला तयार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद".
संदीप रेड्डी वांगाने नेमकं काय म्हटलं?
संदीप रेड्डी वांगाने 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाबद्दल एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांना 'वाईट नजरे'पासून सावध राहण्याचा इशारा दिला. त्यानं लिहलं, "कितीतरी लेखक आणि अभिनेत्यांनी प्रपोगंडा सिनेमावर करिअर बनवली आहेत. तेव्हा इंडस्ट्रीतले लोक गप्प होते. तेच लोक आता 'धुरंधर २'ची खिल्ली उडवत आहेत. तुमची उपहास करण्याची वृत्ती असेल, तर तुम्हाला स्वतःला उदारमतवादी म्हणवण्याचा अधिकार नाही. सत्य गोष्टींना प्रपोगंडा कधीपासून म्हणू जाऊ लागलंय माहीत नाही. आदित्य धर आणि रणवीर सिंह... ही काळी नजर अशी जाणार नाही. मुठभर लाल मिरचीने काम होणार नाही...मिरचीचे पूर्ण शेतच जाळावं लागेल. 'धुरंधर : द रिव्हेंज' काल पाहिला, अप्रतिम सिनेमा...", या शब्दात संदीप रेड्डी वांगाने चित्रपटाचं कौतुक केलं.
Web Summary : Aditya Dhar thanked Sandeep Reddy Vanga for supporting 'Dhurandar: The Revenge' against propaganda claims. Dhar praised Vanga's conviction and offered help for his upcoming film, 'Spirit,' starring Prabhas. Vanga defended the film against critics.
Web Summary : आदित्य धर ने 'धुरंधर: द रिवेंज' का समर्थन करने के लिए संदीप रेड्डी वांगा को धन्यवाद दिया। धर ने वांगा के विश्वास की सराहना की और प्रभास अभिनीत उनकी आगामी फिल्म 'स्पिरिट' के लिए मदद की पेशकश की। वांगा ने फिल्म की आलोचना का विरोध किया।