Join us
Daily Top 2Weekly Top 5

संदीप रेड्डी वांगाच्या बहुचर्चित 'स्पिरिट'ची रिलीज डेट पुढे गेली? कारण ठरला सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:58 IST

नुकताच यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाने 'धुरंधर २' सोबतची टक्कर टाळल्याचे आपण पाहिले आहे. आता अशीच एक मोठी बातमी प्रभासच्या 'स्पिरिट' या चित्रपटाबाबत समोर येत आहे.

मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर आपण पाहिली आहे. परंतु अनेकदा बिग बजेट सिनेमे एकमेकांपासून होणारी टक्कर टाळतात. त्यामुळे दोन्ही सिनेमांसाठी ही फायद्याची गोष्ट ठरते. नुकताच यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाने 'धुरंधर २' सोबतची टक्कर टाळल्याचे आपण पाहिले आहे. आता अशीच एक मोठी बातमी प्रभासच्या 'स्पिरिट' या चित्रपटाबाबत समोर येत आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सुरुवातीला 'स्पिरिट' हा चित्रपट ५ मार्च २०२७ रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. मात्र, नुकतंच सलमान खानने त्याच्या 'SVC63' या चित्रपटासाठी ईद २०२७ ही तारीख जाहीर केली आहे. वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित आणि दिल राजू यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि ईद यांच्यातील सुपरहिट समीकरण लक्षात घेता, संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पिरिट'ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार केला असल्याची चर्चा आहे. 

'मिड डे'च्या रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा आता 'स्पिरिट' १ डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित करण्याची रणनीती आखत आहेत. ही तारीख त्यांच्यासाठी लकी मानली जात आहे, कारण २०२३ मध्ये याच तारखेला रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थात याविषयी अधिकृत घोषणा अद्याप झाली नाहीये. त्यामुळे 'स्पिरिट' हा चित्रपट सलमान खानच्या चित्रपटासोबत अर्थात ईद २०२७ ला प्रदर्शित होणार की, पुढे ढकलण्यात येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

'स्पिरिट' चित्रपट सुरुवातीला त्यातील कलाकारांमुळे चर्चेत होता. या चित्रपटात आधी दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती, परंतु निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे आता तिच्या जागी तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. सध्या संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोरवर काम करत असून त्याचा फर्स्ट लूक पोस्टर आधीच प्रदर्शित झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sandeep Reddy Vanga's 'Spirit' release delayed? Salman Khan the reason?

Web Summary : Prabhas' 'Spirit' release may shift from Eid 2027 due to Salman Khan's film. December 2027 is considered as a potential new release date.
टॅग्स :सलमान खानप्रभासबॉलिवूडTollywood