Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी तोंड उघडले तर...! एक्स-बॉयफ्रेन्डच्या आरोपांवर सना खानचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:23 IST

मेल्विन लुईस आणि अभिनेत्री सना खान यांच्या लव्ह अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप जास्त चर्चेत आहे.

ठळक मुद्देदरम्यान काही दिवसांपूर्वी सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ब्रेकअपचे कारण सांगितले होते.

डान्स ट्रेनर मेल्विन लुईस आणि अभिनेत्री सना खान यांच्या लव्ह अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप जास्त चर्चेत आहे. ब्रेकअपनंतर लुईस व सना दोघेही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. कालच  एक्स-बॉयफ्रेन्ड लुईसने सनाची पोलखोल केली होती. होय, लुईसने त्याच्या सोशल अकाऊंटवर सना व त्याच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप शेअर केली होती. ही ऑडिओ क्लिप शेअर करताना लुईसने #MenAreAlsoVictims, #YouMockedMyRace  यासारख्या हॅशटॅगचा वापर केला होता.  तू माझी खिल्ली उडवलीस, माझ्या धर्मावरून, माझ्या रंगावरून बोललीस. माझ्या कुटुंबाचाही तू अपमान केलास, असे आरोप त्याने ही ऑडिओ क्लिप शेअर करताना केले होते. आता सनाने लुईसच्या या आरोपांना उत्तर दिले आहे.

होय, ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत तिने लुईसवर आगपाखड केली.  ‘ तो आता रंगाबद्दल बोलतोय. पण  मी त्याला डेट करणे सुरु केले तेव्हाही तो त्याच रंगाचा होता. त्यावेळी तो माझ्या रंगाचा होता आणि नंतर जळून असा झाला, असे काहीही नाही. तो त्याच रंगाचा होता. कॉल रेकॉर्डिंग शेअर करून  तो सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करतोय,’असे सना म्हणाली. 

ती इथेच थांबली नाही तर लुईसविरोधातील सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही तिने केला. ‘मी  तोंड उघडलेच तर ते त्याच्यासाठी अडचणीचे ठरेल. कारण त्याच्या सर्व कारनाम्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. मला कायदा चांगलाच माहित आहे. माझ्यासारख्या अनेकजणी त्याच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या. त्या सुद्धा बोलायला तयार आहेत. त्याने एका लहान मुलीला गर्भवती केले होते,’ असा दावाही तिने केला.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?  काल मेल्विन लुईसने त्याच्या व सनाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर केली होती. या  ऑडिओ क्लिपमध्ये लुईस आणि सनाचे संभाषण ऐकू येतेय.  मी तुला अपमानित केले, कारण असे करून मला सार्वजनिक जीवनात आनंद मिळतोस, असे सना म्हणते. यावर लुईस, तुझा असा काही प्लान असेल, हे मला पक्के ठाऊक होते, असे म्हणतो. यावर, हो हा माझा प्लानच होता, असे सना त्याला म्हणते.  

 ‘तू माझी खिल्ली उडवलीस, माझ्या धर्मावरून, माझ्या रंगावरून बोललीस. माझ्या कुटुंबाचाही तू अपमान केलास. माझ्या मते,तू तुझे काम केले. निश्चित यात तुला आनंद मिळाला असेल,’ असे ही ऑडिओ क्लिप शेअर करताना लुईसने कॅप्शनमध्ये लिहिले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ब्रेकअपचे कारण सांगितले होते. याशिवाय तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा एक पोस्ट शेअर केली होती. ‘त्याच्यामुळे त्याची एक विद्यार्थिनी प्रेग्नन्ट होती, हे मला कळले तेव्हा मला प्रचंड दु:ख झाले. माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे. त्याच्या याच सवयीमुळे तो अद्यापही स्ट्रगल करतोय. शेवटी देव शिक्षा देतोच,’असे तिने म्हटले होते.    

टॅग्स :सना खान