Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 06:00 IST

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केले आहेत.

‘बिग बॉस 6’ आणि सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमात दिसलेली तीच ती चुलबुली सना खान. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनाने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल... मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल, असे सनाने या पोस्ट शेअर करत बॉलिवूडपासून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले.

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केले आहेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.

रिपोर्ट्सनुसार सना खानने जेव्हा इंडस्ट्री सोडली तेव्हा ती यशस्वी अभिनेत्री बनली होती. सनाला एका सिनेमासाठी खूप चांगले मानधन मिळायचे. तिच्या संपत्तीबाबत कुठेही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नसली तरीही सिनेमात काम करून सना एका वर्षात जवळपास 11 कोटी रुपये कमवायची. 

याच वर्षाच्या सुरुवातीला सना खानचे बॉयफ्रेन्ड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता या सर्व जुन्या पोस्ट तिने तिच्या अकाऊंटवरून डिलीट केल्या आहेत. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पाठोपाठ खुद्द सनाने ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता सनाने तिचे नावही बदलले आहे. इन्स्टाग्रामवर तिने नाव बदलून सैय्यद सना खान असे नवे नाव धारण केले आहे.

एकमेकांवर प्रेम केले अल्लाहसाठी... एकमेकांसोबत ‘निकाह’ केला अल्लाहसाठी... अल्लाहने आम्हाला या जगात एकत्र ठेवावे, स्वर्गातही ही सोबत अशीच राहावी..., असे लिहित सनाने ‘निकाह’ची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

टॅग्स :सना खान