Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:15 IST

होय, अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन तिने काय करावे तर कर्नाटकातील Mullayanagiri  हे सर्वात उंच शिखर सर केले.

ठळक मुद्दे२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती.

समीरा रेड्डी नुकतीच आई झाली. नुकताच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीराने आपल्या चिमुकलीचे नायरा असे नामकरण केले. नायरा आता उणीपुरी अडीच महिन्यांची झालीय.  या अडीच महिन्यांच्या नायराला घेऊन समीराने काय करावे तर कर्नाटकातील Mullayanagiri हे सर्वात उंच शिखर सर केले. होय, एक व्हिडीओ शेअर करत समीराने याबद्दल माहिती दिली. 

नायरासोबत Mullayanagiri  शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मी एकाठिकाणी थांबले. कारण मला श्वास घ्यायला त्रास होत होता. 6300 फूट उंचीचे हे कर्नाटकातील सर्वात उंच शिखर आहे. अनेक न्यू मॉम्सचे मॅसेज येत आहेत. त्या ट्रॅव्हल करण्यास प्रेरीत आहेत. माझ्या ट्रॅव्हल स्टोरीजला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी भारावले आहे. बाळाच्या जन्मानंतर थकले असे म्हणणे सोपे आहे. पण मी असे न म्हणण्याचा निश्चय केला होता. मी माझ्या मुलीची संपूर्ण काळजी घेतेय, असे समीरा या व्हिडीओत सांगतेय.

समीराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. समीराने गत 12 जुलैला नायराला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य. अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक  अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते.  

ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.  

टॅग्स :समीरा रेड्डी