Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतविरोधात समीर वानखेडेंची कोर्टात धाव, दाखल केला खटला, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:53 IST

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. राखी सावंत विरोधात क्रांती रेडकरचे पती आणि एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. राखी सावंत विरोधात क्रांती रेडकरचे पती आणि एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी राखीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखीबरोबरच तिचे वकील काशीफ अली खान यांच्याविरोधातही त्यांनी मानहानी खटला दाखल केला आहे. 

राखी आणि तिच्या वकिलांनी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचं समीर वानखेडेंनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटलं आहे. मुंबईतील दिंडोशी सिव्हिल कोर्टात वानखेडेंनी राखी आणि तिच्या वकिलांविरोधात मानहानीचा खटला दाखल करत मानहानी दाव्याची किंमत ११ लाख रुपये केली आहे. राखी आणि तिच्या वकिलांनी वानखेडेंविरोधात अनेक वक्तव्य केली होती. २०२३मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राखीच्या वकिलांनी मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी वानखेडे सेलिब्रिटींना टार्गेट करत असल्याचं म्हटलं होतं. यामुळे वानखेडेंची बदनामी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण करिअर डागरहित असल्याचंही वानखेडे म्हणाले. 

राखी काय म्हणाली होती? 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणावेळी राखीने वानखेडेंविरोधात वक्तव्य केलं होतं. आर्यन खान निर्दोष असल्याचं म्हणत तिने अनेक व्हिडिओ शेअर केले होते. यामध्ये तिने "जर तुम्ही सिंह असाल तर सिंहाबरोबर लढा, गिधाड बनून मुलांची शिकार करू नका", असं राखी म्हणाली होती. 

समीर वानखेडेंनी मानहानी खटला दाखल केल्यानंतर राखीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कायद्यानुसार, जर तुम्ही जनतेच्या भल्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट बोलत असाल तर त्यात कोणतीही मानहानी होत नाही. याचं नक्कीच उत्तर देणार. जर त्यांनी हे सिद्ध केलं तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन", असंही काशीफ अली खान म्हणाले. याबाबत अद्याप राखीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

टॅग्स :राखी सावंतसमीर वानखेडेसेलिब्रिटी