Join us

‘फिटनेस फ्रिक’ सामंथा रूथ प्रभुला या आजारापणामुळे सोडले होते अनेक सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:55 IST

Samantha Ruth Prabhu : सामंथा किती मोठी फिटनेस फ्रीक आहे, हे नव्यानं सांगायला नको. अर्थात इतकी फिटनेस फ्रीक असूनही सामंथा एका गंभीर आजाराचा सामना करत होती.

‘पुष्पा : द राइज’ या  चित्रपटामधील सेन्शुअल आयटम साँगवर थिरकणारी सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सामंथा साऊथची बडी अभिनेत्री. लोक तिच्या प्रेमात अक्षरश: वेडे आहेत. तिची अ‍ॅक्टिंग,डान्सिंग, स्टाईलवर फिदा आहे. तिच्या फिटनेसचेही चाहते आहेत. सामंथा किती मोठी फिटनेस फ्रीक आहे, हे नव्यानं सांगायला नको. अर्थात इतकी फिटनेस फ्रीक असूनही सामंथा एका गंभीर आजाराचा सामना करत होती. या आजारपणामुळे तिला काही मोठे सिनेमेही सोडावे लागले होते.

होय, 2013 मध्ये मेडिकल टेस्टमध्ये ती डायबिटिक असल्याचं निदान झालं होतं. आता सामंथाचा मधुमेह नियंत्रणात आहे. पण त्यावेळी डॉक्टरांनी तिला सक्तीची सहा महिन्यांची विश्रांती घ्यायला सांगितली होती. यामुळे मणिरत्नम आणि अन्य काही मोठ्या दिग्दर्शकांचे सिनेमे तिला ऐनवेळी सोडावे लागले होते. सहा महिने अभिनयापासून दूर राहून सामंथाने नुसती विश्रांती घेतली होती.त्याआधी वर्षभरापूर्वी सामंथा एका त्वचा विकाराचा सामना करत होती. पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन या स्किन संबंधित आजारामुळे ती बेहाल झाली होती. या आजारात सूर्यप्रकाशात गेल्यानंतर त्वचा पोळायला लागते.

एका मुलाखतीमध्ये सामंथाने तिची इम्यूनिटी सिस्टम ही नाजूक असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तिला इंफेक्शनचा धोका वाढतो. साहजिकच या कारणामुळे सामंथा तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देते. मुख्यत:  डाएट आणि वर्क आऊट याबद्दल ती अतिशय सजग आहे. सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली होती.  काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी