Join us

समांथा उपचारासाठी शूटिंगपासून घेणार ब्रेक, पण या सिनेमातून येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:15 IST

समंथा अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेत आहे. निर्मात्याचे पैसेही तिने परत केले असल्याची चर्चा आहे.

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)ने चित्रपटांमधून ब्रेक घेतला.  अलीकडेच ती हैदराबाद विमानतळावर दिसली. कुशी या चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती हैदराबादला परतली. या चित्रपटात त्याच्यासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता समंथाकडे कोणतीही वर्क कमिटमेंट नाहीय. तिने कुशी आणि सिटाडेलचे शूटिंग पूर्ण केलंय.

समंथा अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेत आहे. निर्मात्याचे पैसेही तिने परत केले असल्याची चर्चा आहे. . कामातून ब्रेक घेतल्यानंतर ती पहिल्यांदाच विमानतळावर दिसली. तिला पाहण्यासाठी पापाराझी आणि चाहते खूप उत्सुक होते. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

समंथा गुरुवारी रात्री एअरपोर्टवर दिसली. यावेळी ती कुशी सिनेमाचे लास्ट शेड्यूलचे शूटिंग पूर्ण करुन परतली. समंथा एअरपोर्टवरुन बाहेर पडून थेट आपल्या गाडीत जाऊन बसली. पापाराझींनी फोटो देण्यासाठी ती कुठेच थांबली नाही. पापाराझींनी ही अभिनेत्रीला थांबवून त्रास न देणं पसंत केलं. 

समंथा जवळपास एक वर्षांचा ब्रेक घेणार आहे. यादरम्यान ती आपल्या तब्येतची काळजी घेणार आहे. मायोसायटिस या गंभीर आजाराचा ती सामना करत आहे. अशातच आता तब्येतीकडे लक्ष द्यायचं या कारणाने ती काही काळ कामातून ब्रेक घेत आहे. किमान एक वर्ष तरी समंथा मोठ्या पडद्यावर दिसणार नाही. माध्यम रिपोर्ट्सनुसार, हातात असलेले प्रोजेक्टही तिने सोडले असून निर्मात्याला पैसेही परत दिले आहेत. समंथाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 'समंथा कामातून एक वर्षाचा मोठा ब्रेक घेत आहे आणि कोणतीही नवी तेलुगू किंवा बॉलिवूड फिल्म साईन करणार नाही. या वेळेचा उपयोग ती आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी करणार आहे. समंथाने निर्मात्यांनी दिलेलं आगाऊ पेमेंटही परत दिलं आहे.'

2022 वर्षाच्या अखेरीस समंथाने पोस्ट शेअर करत तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. मायोसायटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ती त्रस्त आहे. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. नुकतेंच सिटाडेल सिनेमाच्या शूटिंगवेळी आजारपणाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत सेंट सावा चर्चला भेट दिली होती. इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत तिने याची माहिती दिली होती.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी