Join us

Samantha Ruth Prabhu:शूटिंग दरम्यान अभिनेत्री झाली जखमी, फोटो शअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:55 IST

समांथाला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून तिचं चाहते काळजीत पडले आहेत.

समांथा रुथ प्रभू लवकरच 'सिटाडेल' या वेबसिरीजद्वारे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, अभिनेत्रीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान समंथाला खूप दुखापत झाली होती. ती अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजच्या भारतीय व्हर्जनसाठी शूटिंग करत आहे. एक अॅक्शन सीन शूट करत असताना हा अपघात झाला. त्यादरम्यानचे फोटो शेअर समंथाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेत.'Perk of action' असे कॅप्शन तिनं याला दिलं आहे.

समांथाला झाली दुखापतसमांथा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. आता अभिनेत्रीने तिच्या जखमी हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. 

'सिटाडेल'या वेब सीरिजच्या ऑरिजनल व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्या इंडियन व्हर्जनमध्ये सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. अभिनेत्रीबद्दल, निर्माते राज आणि डीके म्हणाले की जेव्हा शोची स्क्रिप्ट फायनल झाली तेव्हा सामंथा ही पहिली पसंत होती. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीसेलिब्रिटी