Join us
Daily Top 2Weekly Top 5

इकडे 'शाकुंतलम' फ्लॉप, तिकडे समांथाने खरेदी केलं हैदराबाद आलिशान डुप्लेक्स घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:34 IST

समांथाने मुंबईत घर खरेदी केल्यानंतर आता पुन्हा हैदराबादमध्ये घर खरेदी केलं होतं.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला तमिळ, तेलुगू आणि हिंदी शीर्षकांची वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या वेगवेगळ्या पात्रांना सादर केल्यानंतर भारतीय श्रोते आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात नावाजले गेले आहे. समांथा रुथ प्रभू ही साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. समांथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या नवा घरामुळे समांथा चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्रीने हैदराबादमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन नवं घर खरेदी केलं आहे. 

रिपोर्टनुसार समांथाने हैदराबादमध्ये 3BHK चा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. समांथानेचे नवं घरं जयभेरी ऑरेंजमध्ये आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्रीने हे घर ७.८ कोटींमध्ये खरेदी केलं आहे. समांथा सध्या हैदाराबादमधील महलनुमा या पॉश एरियात राहतील. हे तेच घरं आहे ज्यात ती एक्स पती नागा चैतन्य सोबत राहायची. सामंथाने याआधी गेल्यावर्षी एक्स हसबंडचं हैदराबादमधील घर खरेदी केलं होतं. घटस्फोटानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. नंतर अशी बातमी समोर आली होती की, सामंथाने एक्स हसबंडचं घर खरेदी केलं आहे. जिथे ते राहत होते. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की, या घरासोबत तिच्या काही भावना जुळलेल्या होत्या. त्यामुळेच तिने हे घर खरेदी केलं. यासाठीही सामंथाने मोठी रक्कम दिली होती.

अलिकडेच समांथाने मुंबईत १५ कोटीला आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे जुबली हिल्समध्ये एक प्रशस्त घर आहे, ज्याची किंमत १०० कोटी आहे. हैदराबादमध्ये घर खरेदी केल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत.  ---

टॅग्स :समांथा अक्कीनेनी