Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागार्जुनची सून समांथाने प्रेग्नेंसीच्या वृत्ताबाबत केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:03 IST

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू २०१७ साली बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. लग्नानंतर समंथा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू २०१७ साली बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. लग्नानंतर समंथा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र नेहमीप्रमाणे यावेळीदेखील असे वृत्त ऐकताच समांथाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

समांथाचे नवे गाणे बेबी अक्किनेनी सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. कारण समांथाने ट्विटरवर आपले नाव बदलून बेबी अक्किनेनी असे केले होते. त्यानंतर समांथाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. या वृत्ताला घेऊन एका युजरने समांथाला प्रश्न केला. त्यावर समांथाने त्या युजरला टॅग करीत त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले.

समांथाने लिहिले की, काय ते? जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा आम्हालादेखील सांगा. युजरने विचारले होते की, समांथा प्रेग्नेंट आहे का? 

समांथा मे महिन्यात तिचे सासरे नागार्जुन व अभिनेत्री रकुल प्रीतसोबत मनमधु २ चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुर्तगालला गेले होते. त्यानंतर ती नवरा नागा चैतन्यसोबत स्पेनमध्ये सुट्ट्या व्यतित करण्यासाठी गेली होती. तिथले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. 

समांथा आणि नागा चैतन्य यांचे लग्न रॉयल पद्धतीने झाले होते. कारण जवळपास दहा कोटी रुपये लग्नसोहळ्यासाठी खर्च केले होते. त्यानंतर हैद्राबादमध्ये दोघांनी ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड, टॉलिवूड व राजकीय जगतातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती.