Join us

निर्मात्यांना आणि वकीलांना माझा सलाम :​ अभिषेक चौबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 20:29 IST

‘वकीलांचे कष्ट फळास आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मी अतिशय आनंदात आहे. ‘उडता पंजाब’चे संदर्भ लक्षात घेऊनच कोर्ट निर्णय ...

‘वकीलांचे कष्ट फळास आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मी अतिशय आनंदात आहे. ‘उडता पंजाब’चे संदर्भ लक्षात घेऊनच कोर्ट निर्णय देईल, असा मला विश्वास होता. निर्मात्यांनी दाखवलेले धाडस आणि वकीलांचे कष्ट याला मी सलाम करतो. आता चित्रपट पास झाला आहे आणि आता आम्ही हा १७ जून रोजी रिलीज करण्यासाठी लढू. मी कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंदी आहे - अभिषेक चौबे, ‘उडता पंजाब’चे दिग्दर्शकसेन्सॉर बोर्डाविरूद्ध लढा देणारे अनुराग कश्यप यांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला. ‘मेरा भरोसा’ असे टिष्ट्वट त्यांनी केले‘उडता पंजाब’वादात बॉलिवूड विरूद्ध सेन्सॉर बोर्ड असा वाद चांगलाच रंगला होता. अखेर या वादात बॉलिवूडची सरशी झाली. ‘उडता पंजाब’चे दिग्दर्शक अभिषेक चौबे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने जाम खूश आहे. सोमवारी केवळ एक कट आणि तीन डिस्क्लेमरसह कोर्टाने ‘उडता पंजाब’च्या प्रदर्शनास मंजूरी दिली. शिवाय ४८ तासांच्या आत ‘उडता पंजाब’ला ‘ए सर्टिफिकेट’ देण्याचे आदेशही दिले. खरे तर ‘उडता पंजाब’ची स्टोरीच मोठी रोचक आहे. एका क्षणाला तर हा चित्रपट म्हणजे आपली खूप मोठी चूक आहे, असे अभिषेक चौबे यांना वाटून गेले होते. सगळ्यात आधी फायनान्सर शोधता शोधता अभिषेक थकले आणि नंतर यानंतर हा सर्व वाद निर्माण झाला..तब्बल तीन महिने अभिषेक आपल्या चित्रपटासाठी फायनान्सर शोधत प्रॉडक्शन हाऊसेसच्या पायºया झिझवत होते. चित्रपटाचा वादग्रस्त विषय तसेच त्यातील शिव्या यामुळे मोठ मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसने अभिषेक यांना नकार दिला होता. फॉक्स, इरोस व जंगली पिक्चरसारख्या अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसचा नकार अभिषेक यांना पचवावा लागला. हा नकार पचवल्यानंतर अभिषेकही कुठेतरी थकले होते. इतके की हा चित्रपट मनातून काढून टाकण्याचा विचार त्यांनी केला होता. पण अखेरचा प्रयत्न म्हणून अभिषेक यांनी एकता कपूरला स्टोरी ऐकवली आणि एकता कपूरला स्टोरी भावली. अर्थात यासाठीही अनेक बैठका झाल्या. अनेक बैठकांनंतर एकताने या चित्रपटात पैसा ओतरण्याची तयारी दर्शवली. एवढेच नाही तर अनुराग कश्यपची मनधरणी करीत त्यांच्या ‘फँटम फिल्म्स’लाही सोबत घेतले. शाहीद कपूर, करिना कपूर आणि आलिया भट्ट यांना चित्रपटात घ्यायचे म्हणजे त्यांचे मानधन पेलवणारे नव्हते. मात्र अभिषेक चौबे यांच्या आॅफरवर तिन्ही कलाकार एका अटीवर मार्केट रेटच्या अर्ध्या फिसवर या चित्रपटात काम करण्यास राजी झाले. ही अट होती, मुव्हीसाठी किती पैसे घेतले, ते लीक न होऊ द्यायची. कारण यामुळे या तिन्ही स्टारच्या मार्केट व्हॅल्यूवर विपरित परिणाम झाला असता.हे सगळे होणार हे ठाऊक होतेचं...‘उडता पंजाब’वरून वाद निर्माण होणार, हे मला ठाऊक होतेच. ज्या कुठल्या प्रॉडक्शन हाऊससोबत चर्चा केली, त्यांनाही हा अंदाज आला होताच. वादग्रस्त विषय असल्याने सेन्सॉर बोर्ड मुव्ही पास करताना अनेक त्रूटी काढणार, याचा अंदाज होताच, असे अभिषेक चौबे म्हणाले..