Join us

अरिजीतला भेटण्यास सलमानचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 18:35 IST

फेसबुकवर सार्वजनिक माफी मागूनही सलमान खानने गायक अरिजीत सिंगला भेटण्यास नकार दिलाय. अरिजीतसिंगने आपल्या कृत्याबद्दल सलमान खानची माफी मागितली ...

फेसबुकवर सार्वजनिक माफी मागूनही सलमान खानने गायक अरिजीत सिंगला भेटण्यास नकार दिलाय. अरिजीतसिंगने आपल्या कृत्याबद्दल सलमान खानची माफी मागितली होती. ‘सुलतान’ या चित्रपटातील आपणे गाणे वगळू नये अशीही विनंती त्याने केली होती. अभिनेता निखील द्विवेदीने सलमानची बाजू घेताना म्हटले आहे की, ‘गाणे वगळण्यासाठी सलमानला दोषी धरता येणार नाही. केवळ त्याने अरिजीतला भेटण्यास नकार दिला आहे.’ निखील हा सलमानच्या अगदी जवळचा आहे. संगीतकार एखादे गाणे विविध गायकांकडून गावून घेतात. त्यांना जे आवडते ते ठेवतात. सुलतानच्या बाबतीत निर्माता आदित्य चोप्रा आणि संगीतकार विशाल शेखर यांचा निर्णय आहे, असेही निखील म्हणाला.