‘सुल्तान’नंतर कबीरच्या सिनेमात असा असेल सलमानचा न्यू लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 22:14 IST
सलमान खानचा ‘सुल्तान’ येत्या ६ जुलैला सिनेमागृहांमध्ये येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सल्लू सध्या बिझी आहे आणि हे आटोपले की, ...
‘सुल्तान’नंतर कबीरच्या सिनेमात असा असेल सलमानचा न्यू लूक!
सलमान खानचा ‘सुल्तान’ येत्या ६ जुलैला सिनेमागृहांमध्ये येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सल्लू सध्या बिझी आहे आणि हे आटोपले की, सल्लू त्याच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी होणार आहे. सलमानचा नवा प्रोजेक्ट कोणता असेल? काल ‘सुल्तान’च्या आॅन-शूट इव्हेंटमध्ये सलमानला हा प्रश्न विचारण्यात आला आणि सलमानने याचे मनमोकळे उत्तरही दिले. होय..कबीर खानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये मी दिसणार आहे. या चित्रपटात माझ्यासोबत सोहेलही असणार आहे. तो माझ्या लहान भावाच्या भूमिकेत असेल, असे सलमानने सांगितले. ‘सुल्तान’मध्ये सलमान पेहलवानाच्या आगळ्या वेगळ्या लूकमध्ये दिसला. ‘ट्यूबलाईट’मध्ये असे काय नवे असेल? असे विचारल्यावर माझी नवी हेअरकट असे उत्तर सलमानने दिले. कबीरच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये मी नव्या हेअरकटमध्ये दिसणार आहे, असे सल्लू म्हणाला. आहे ना इंटरेस्टिंग...!!