सलमानच्या लूलियाचे आधी झालेयं एक लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 17:32 IST
सलमान खान व लूलिया वंतूर यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा जोरावर आहे. लवकरच सलमान लूलियासोबत लग्न करणार असल्याची खबरही आहे. याचदरम्यान ...
सलमानच्या लूलियाचे आधी झालेयं एक लग्न!
सलमान खान व लूलिया वंतूर यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा जोरावर आहे. लवकरच सलमान लूलियासोबत लग्न करणार असल्याची खबरही आहे. याचदरम्यान लूलिया व तिच्या एक्स हनीची अर्थात पूर्वाश्रमीच्या नवºयाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. लूलिया व रोमानियाचा सुपरस्टार मारियस मोगा यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. लूलिया व मोगा सुमारे चार वर्षे सोबत राहिले. मात्र २०१० मध्ये जमेनासे झाल्यावर दोघांचाही घटस्फोट झाला. या फोटोंचा सलमान व लूलियाच्या नात्यावर किती परिणाम होईल, हे आम्हाला ठाऊक नाही.पण कदाचित तशी शक्यता कमीच आहेच. कारण संगीता बिजलानीपासून कॅटरिना कैफ अशा अनेक मुली सलमानच्या आयुष्यात येऊन गेल्या आहेत. अशास्थितीत सलमान लूलियाच्या भूतकाळ कसा बरे मनावर घेईल?? कदाचित सलमान लूलियाचा भूतकाळ जाणून असावा, असेही असू शकते...शक्यता काहीही असोत, सलमान-लूलियाचे नाते पुढे जावे, असेच आम्ही म्हणू...!!