अर्पिताच्या बाळाला सलमानचे अलिशान गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 19:12 IST
सलमान खानची बहिण अर्पिता आपल्या बाळासह अर्थात आहिलसोबत घरी पोहोचली. ती घरी पोहोचताच तिच्या घरासमोर एक अलिशान गाडी उभी ...
अर्पिताच्या बाळाला सलमानचे अलिशान गिफ्ट
सलमान खानची बहिण अर्पिता आपल्या बाळासह अर्थात आहिलसोबत घरी पोहोचली. ती घरी पोहोचताच तिच्या घरासमोर एक अलिशान गाडी उभी होती. सलमान खानने आपली बहीण अर्पिता आणि गोड भाच्याला हे गिफ्ट दिले होते. मंगळवारी रूग्णालयातून सुटी मिळाल्यावर अर्पिता थेट घरी पोहोचली. अर्पिताने ३० मार्चला बाळाला जन्म दिला. अर्पिता आणि आशुषचे हे पहिले बाळ आहे. अर्पिताच्या बाळामुळे सलमान अतिशय आनंदी आहे. तो जन्मल्यानंतर काहीच वेळात सलमान त्याला पाहायला रूग्णालयात पोहोचला होता. यावेळी भाच्याचा गोड गोड पापा घेतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाला होता.