‘किक2’मध्ये दिसणार का सलमानची गर्लफ्रेन्ड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 14:31 IST
सलमान खान आणि यूलिया वेंटर यांच्यात काय सुरु आहे, हे अद्याप तसे स्पष्ट झालेले नाही. कुणी म्हणत, यूलिया सलमानची ...
‘किक2’मध्ये दिसणार का सलमानची गर्लफ्रेन्ड?
सलमान खान आणि यूलिया वेंटर यांच्यात काय सुरु आहे, हे अद्याप तसे स्पष्ट झालेले नाही. कुणी म्हणत, यूलिया सलमानची गर्लफ्रेन्ड आहे तर कुणी म्हणत, सलमान यूलियासोबत लवकरच लग्न करणार आहे. खरे काय, ते आम्हाला ठाऊक नाही. पण रिअल लाईफमध्ये भलेही नसो पण रिल लाईफमध्ये सलमान व यूलिया एकत्र येणार असल्याची माहिती आम्हाला मिळालीयं.होय, यूलियाने अलीकडे गायक हिमेश रेशमियासाठी एक गाणे गायले. आता खबर आहे ती सलमानच्या ‘किक’ या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलमध्ये यूलिया झळकणार ही. ‘किक’मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस दिसली होती. पण या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मात्र यूलियाची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा आहे. आता या बातमीत किती तथ्य ते ठाऊक नाही. कारण या चित्रपटासाठी क्रिती सॅनॉन हिच्या नावाचीही चर्चा आहे.मध्यंतरी सलमान व जॅकलिनच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची कुजबुज कानावर आली होती. पण जॅकलिना ‘बीर्इंग ह्युमन ’चा चेहरा बनवून या चर्चेत काहीही तथ्य नसल्याने सलमानने दाखवून दिले.‘किक’मध्ये सलमान व जॅकलिनची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण ‘किक2’मध्ये सलमानला एक नवा चेहरा घेऊ इच्छित आहे. आता हा नवा चेहरा कोण हे, वेळ आल्यानंतरच आपल्याला कळणार.‘किक2’चे शूटींग लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात सलमानसोबत कुणाची वर्णी लागतेय, ते लवकरच समजेल. तूर्तास सलमान ‘ट्युबलाईट’ आणि ‘बिग बॉस’च्या होस्टिंगमध्ये बिझी आहे. या वर्षात ईदच्या मुहूर्ताला ‘ट्युबलाईट’ रिलीज होतोय.