सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूरने केले लग्न; पुन्हा एकदा भाईजानला मिळाला ‘प्यार में धोका’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 21:59 IST
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान गेल्या काही काळापासून रोमानियन मॉडेल युलिया वंतूर हिला डेट करीत आहे. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या प्रेमाचे ...
सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूरने केले लग्न; पुन्हा एकदा भाईजानला मिळाला ‘प्यार में धोका’!
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान गेल्या काही काळापासून रोमानियन मॉडेल युलिया वंतूर हिला डेट करीत आहे. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या प्रेमाचे किस्से आजही चर्चिले जातात. चर्चा तर इथपर्यंत होती की, इंडस्ट्रीमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान आपली वॉण्टेड इमेज तोडून युलियासोबत संसार थाटणार आहे. परंतु पुन्हा एकदा भाईजान सलमानला ‘प्यार में धोका’ मिळाला आहे. होय, त्याची गर्लफ्रेंड युलियाने चुपचाप आपले स्वयंवर उरकून एका दाढीवाल्या कलाकाराच्या गळ्यात माळ टाकली आहे. बातमी वाचून तुम्हाला धक्का बसला ना? जेव्हा आमच्यापर्यंत ही बातमी आली तेव्हा आमचीही अशीच काहीशी रिअॅक्शन होती. परंतु हे सर्व रिअल लाइफमध्ये नव्हे तर रिल लाइफमध्ये घडले आहे. त्याचे झाले असे की, ‘द व्हॉइस इंडिया किड्स’च्या सेटवर युलियाचे स्वयंवर ठेवले होते. ज्यामध्ये सलमान, रणवीरला सोडून युलियाने अभिनेता जय भानुशाली याच्या गळ्यात माळ टाकली. सूत्रानुसार, युलिया आणि मनीष पॉल एका खास एपिसोडसाठी शोमध्ये आले होते. जयने युलियाला मंचावर बोलावित विचारले की, ‘तुला ज्याच्याशी लग्न करायचे आहे तो कसा असेल?’ युलियाने जयच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, मी एका पुरुषाच्या शोधात आहे, ज्याची दाढी वाढलेली आहे. युलियाचे हे उत्तर संपताच जयने मंचावर तीन कटआउट्स आणले. त्याचबरोबर युलियाच्या हातात एक हार दिला. हे कटआउट्स सलमान खान, रणवीर सिंग आणि रणबीर कपूरचे होते. परंतु युलियाने या तिन्ही कटआउट्सकडे काणाडोळा करीत जयच्या गळ्यात हार टाकला. तसेच त्याला जीवनसाथी म्हणून निवडल्याचे जाहीरही केले.