Join us

​अजय देवगनच्या चित्रपटात सलमानचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:58 IST

अजय देवगनच्या ‘शिवाय’ या आगामी चित्रपटात सलमान खानला एक स्पेशल गाणे आॅफर केले गेले आहे आणि मिळालेल्या बातमीनूसार सलमान ...

अजय देवगनच्या ‘शिवाय’ या आगामी चित्रपटात सलमान खानला एक स्पेशल गाणे आॅफर केले गेले आहे आणि मिळालेल्या बातमीनूसार सलमान यासाठी तयार देखील झाला आहे. हो, हे खरे आहे, सलमान या धमाकेदार दिवाळीला रिलीज होणाऱ्या या चिपटात एका गाण्यात दिसेल. यात काही शंका नाही की, या बातमीमुळे सलमान आणि अजयचे चाहते खूपच खूश होतील. आपल्याला आठवत असेल की, या अगोदरही अजयच्या ‘सन आॅफ सरदार’मध्ये सलमान ने ‘पो पो पो पो...’गाणे केले होते.