सलमान वॉन्ट्स टू किल रणवीर? पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 10:38 IST
‘सुल्तान’ सध्या बॉक्स आॅफीसवर धूम करतोय. सर्वत्र सलमानचे कौतुक होतेय. मग यात रणवीर कसा मागे राहील? तो तर पॅरिसला ...
सलमान वॉन्ट्स टू किल रणवीर? पण का?
‘सुल्तान’ सध्या बॉक्स आॅफीसवर धूम करतोय. सर्वत्र सलमानचे कौतुक होतेय. मग यात रणवीर कसा मागे राहील? तो तर पॅरिसला ‘बेफि क्रे’ ची शूटींग करत असताना थोडा वेळ काढून तेथील एका थिएटरवर गेला आणि तिथे ‘बेबी को बेस पसंद हैं’ या गाण्यावर स्टेजवर जाऊन तुफान डान्स केला.सर्व प्रेक्षकांनीही मस्त धम्माल केली. पण हे कळाल्यानंतर सलमानलाही त्याचे कौतुक वाटले. आणि तो गमतीत म्हणाला,‘ मला रणवीरला मारायचेय. तो तिथे चित्रपट पहायला गेला होता की, डान्स करायला? ’वेल, सलमानच्या चित्रपटातील गाणेच एवढे चांगले असतात की, त्यावर कोणीही ठेका धरू शकेल! सध्या रणवीर ‘पदमावती’ साठी शुटींग करतोय. यात त्याची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोन देखील त्याच्यासोबत आहे.