सलमान सुचवतोय कतरिनाचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:10 IST
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर कतरिनाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे आणि तिच्या करिअरसाठी सलमान ...
सलमान सुचवतोय कतरिनाचे नाव
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर कतरिनाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे आणि तिच्या करिअरसाठी सलमान खान तिला मदत करणार असल्याचे म्हटले जात आहे. राजकुमार संतोषी यांच्या एका चित्रपटात कतरिनाला घ्यावे अशी सलमानने शिफारस केली आहे. त्याचसोबत वीरा दी शादी या चित्रपटातही सलमानच्या सांगण्यावरून कतरिनाला घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात कतरिनाला घ्यावे यासाठी सलमानने रिया कपूर आणि सोनम कपूर यांच्याकडे शब्द टाकला असल्याचे म्हटले जाते.